फिंगरप्रिंट सेन्सर, HD+ डॉट ड्रॉप डिस्प्ले, जबरदस्त कॅमेराचा फोन लाँच, किंमत फक्त ५९९९ रुपये

Redmi A2+ भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनला बजेट सेगमेंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. फोनमध्ये बजेटनुसार, अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. ज्यात अँड्रॉयड १३ (गो एडिशन), ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी, एचडी प्लस डॉट ड्रॉप डिस्प्लेचा समावेश आहे. कंपनीने या देशात स्मार्टफोनला खास तरुणांसाठी लाँच केले आहे. Redmi A2+ ची किंमत आणि कोणकोणते फीचर्स दिले आहेत. सविस्तर जाणून घ्या.

Redmi A2+ ची किंमत
Redmi A2+ च्या 4GB + 64GB स्टोरेज व्हेरियंटला ८ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर Redmi A2 ला तीन व्हेरियंट मध्ये खरेदी करू शकता. याच्या 2GB + 32GB स्टोरेज व्हेरियंटला ५ हजार ९९९ रुपये तर 2GB + 64GB स्टोरेज व्हेरियंटला ६ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी खरेदी करता येऊ शकते. ICICI बँकेच्या यूजर्सला ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. या फोनचा सेल २३ मे पासून सुरू होईल. या फोनला Amazon.in, Mi.com, Mi Home आणि सर्व रिटेलर्स पार्टनर्सवरून खरेदी करता येऊ शकते.

Redmi A2+ चे फीचर्स
हा फोन लेदर फिनिश बॉडी सोबत येतो. हा फोन सी ग्रीन, एक्वॉ ब्लू आणि क्लासिक ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. याचा पिक्सल रिझॉल्यूशन 1600×720 आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ३६ ऑक्टा कोर प्रोसेसर दिले आहे. सोबत ४जीबी रॅम आणि ६४ जीबीचे स्टोरेज दिले आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन अँड्रॉयड १३ गो एडिशनवर काम करतो.

वाचाः दमदार बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत Motorola Edge 40 फोन लाँच

फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा एआय ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा पोर्ट्रेट व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आणि टाइम लॅप्स सारख्या फीचर्स सोबत येतो. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे.

वाचाः पीएम मोदींच्या नेतृत्वात भारताला मोठं यश, 5G रोलआउट नंतर ‘हे’ करून दाखवलं

Source link

Redmi A2 plusRedmi A2+redmi a2+ featuresredmi a2+ priceRedmi A2+ saleरेडमी फोनरेडमी स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment