Google निष्क्रिय खाती का डिलीट करत आहे?
वापरकर्त्यांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने हे करत असल्याचे गुगलचे म्हणणे आहे. निष्क्रिय राहिलेल्या खात्यांमुळे मालवेअर किंवा व्हायरसेस यांचा सिस्टिमध्ये धोका अधिक वाढतो. कारण ही खाती असुरक्षित असतात. त्यांचे डिटेल्स चोरणे देखील सोपे आहे. तसेच, गुगलने म्हटले आहे की टू स्टेप वेरिफेकेशन सेटअप असलेल्या खात्यांपेक्षा निष्क्रिय खाती १० पट जास्त धोक्यात आहेत.
Google अकाउंट कधी डिलीट होणार?
Google च्या मते, निष्क्रिय खाती हटवण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२३ नंतर सुरू होईल.
Google खात्यांसह काय हटवले जाईल?
Google निष्क्रिय खाती तसेच त्यांचा Gmail, Docs, Drive, Meet, Calendar आणि Google Photos सह सर्व डेटा हटवेल.
यूजर्सचे अकाउंट डिलीट झाले आहे हे कसे कळणार?
टप्प्याटप्प्याने खाती काढून टाकली जातील, असे गुगलचे म्हणणे आहे. वापरकर्त्यांचे खाते हटवण्यापूर्वी कंपनी त्यांना सूचना पाठवेल. , “एखादे खाते हटवण्यापूर्वी, आम्ही खाते ईमेल पत्त्यावर आणि रिकव्हरी ईमेलवर (जर एखादे तिथे टाकला असेल तर) हटवण्यापर्यंतच्या महिन्यांमध्ये अनेक सूचना पाठवू.
गुगल अकाउंट अॅक्टिव्ह कसे ठेवायचे?
Google खाते सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्हाला मेलमधील ईमेल वाचावे लागतील, गुगल ड्राइव्ह वापरावे लागेल, यूट्यूब व्हिडिओ पहावे लागतील, गुगल प्ले स्टोअरवर अॅप्स डाउनलोड करावे लागतील, गुगल सर्च वापरावे लागेल.
वाचा : Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान