हायलाइट्स:
- निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मोठा प्लॅन
- ‘या’ जिल्ह्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश
- आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शनमध्ये
परभणी : राज्यात अनेक भागात येणाऱ्या दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चांगलीच अॅक्शनमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यभर मनसेकडून मेळावे आयोजित केले जात आहेत. आज परभणीतही मनसेकडून शहरातील बी रघुनाथ सभाग्रह येथे कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे यावेळी मनसे कडून सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यातील ३ पक्षांची महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. या काळात सरकारकडून सामान्यांना काहीच दिलास मिळाला नाही. फायनान्स कंपन्या आणि बँकेकडून होत असलेली सामान्यांची छडवणूकीवर सरकारकडून ब्र सुद्धा काढण्यात आलं नाही. महावितरणकडून अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यावर ही सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे.
सोबतच केंद्र सरकारने ही जनतेला कोरे आश्वासनच दिले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास यावेळी मनसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला.