Realme Narzo N53 ची किंमत
या फोनला फेदर ब्लॅक आणि फेदर गोल्ड कलरमध्ये आणले आहे. याला दोन व्हेरियंट मध्ये आणले आहे. याचे पहिले व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज सोबत येते. याची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर दुसरे व्हेरियंट ६ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेज सोबत येते. याची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे.
या फोन सोबत काही ऑफर्स सुद्धा दिले आहेत. एचडीएफसी बँक कार्ड धारकांना १ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सूटचे बेनिफिट्स मिळतील. Realme Narzo N53 ला २४ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून खरेदी करता येणार आहे. फर्स्ट सेल अंतर्गत बेस व्हेरियंटवर ५०० रुपये आणि दुसऱ्या व्हेरियंटवर १ हजार रुपयाचा डिस्काउंट दिला जाणार आहे. रियलमी २२ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत स्पेशल सेल चालवणार आहे. यात ७५० रुपये आणि १ हजार रुपयाची सूट दिली जाणार आहे.
Realme Narzo N53 चे फीचर्स
या फोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट दिला आहे. सोबत ६.७४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले मध्ये 180Hz चा टच स्मॅपलिंग रेट दिला आहे. याची स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.३ टक्के आहे. हा फोन ऑक्टा कोर यूनिसोक T612 SoC प्रोसेसर सोबत येतो. यात ६ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. या फोनच्या रॅमला ६ जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन Realme UI 4.0 सोबत Android 13 वर काम करतो.
वाचाः मंगळ ग्रहाच्या दुसऱ्या सर्वात उंच ज्वालामुखीचा फोटो आला समोर, याच्या उंचीपुढं एव्हरेस्टही ठेंगणे
Realme Narzo N53 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा AI प्रायमरी सेन्सर दिले आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 33W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३० मिनिटात फोनला शून्य ते ५० टक्के पर्यंत चार्ज करते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे.
वाचाः दोन वर्षांपासून बंद Gmail accounts होणार बंद, डिसेंबरपासून गुगल लागणार कामाला, जाणून घ्या नेमके डिटेल्स