जिओचा ५९९ रुपयाचा खर्च
जिओचा ५९९ रुपयाचा एक फायबर प्लान आहे. याचाच अर्थ तुम्हाला १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल. त्यामुळे तुम्हाला १२० रुपये जास्त टॅक्स द्यावा लागेल. या प्रमाणे हा रिचार्ज प्लान तुम्हाला ७१० रुपये किंमतीत मिळेल.
प्लानमध्ये कोणते बेनिफिट्स
जिओच्या ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा मिळेल. यूजर्सला 30mbps डाउनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड मिळेल. याप्रमाणे यूजर्स हवा तितका डेटा वापरू शकतो. सोबत फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. त्यामुळे तुम्ही रात्रभर कॉलिंग करू शकता. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला ५५० हून जास्त टीव्ही चॅनेल ऑन डिमांड मिळते. हा प्लान एक महिन्यासाठी म्हणजेच ३० दिवासाच्या वैधते सोबत येतो.
वाचाः मंगळ ग्रहाच्या दुसऱ्या सर्वात उंच ज्वालामुखीचा फोटो आला समोर, याच्या उंचीपुढं एव्हरेस्टही ठेंगणे
या प्लानमध्ये यूजर्सला १४ फ्री ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये Disney Plus Hotstar, SonyLIV, Zee5, Voot Select, Voot Kids, Sun NXT, HoiChoi, Discovery+, Uviversal+, Alt balaji, Eros Now, Lionsgate Play, Shemaroome, JioCinema, JioSaavn ओटीटी अॅप्स ऑफर केले जात आहेत.
वाचाः Elista Air Cooler: ९० लीटरचा एअर कूलर लाँच, किंमत फक्त ७ हजार
वाचाः Samsung Galaxy F54 5G फोन लाँच होण्यापूर्वी स्पेसिफिकेशन झाले लीक, किंमत देखील समोर