मोबाइल स्पीडमध्ये भारत ११५ टक्के ग्रोथ
भारताची मोबाइल स्पीड मध्ये एप्रिल मध्ये ११५ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या दरम्यान मोबाइल डाउनलोडिंग स्पीड ३६.३५ Mbps आहे. जी मागील महिन्यात ३३.३० Mbps होती. या व्यतिरिक्त फिक्स्ड सरासरी डाउनलोडिंग स्पीड भारतात वाढून ५१.१२ Mbps झाली आहे. जी मार्च महिन्यात ५०.७१ Mbps होती.
वाचाः दमदार बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत Motorola Edge 40 फोन लाँच
मोबाइल सोबत ब्रॉडबँडची स्पीडही वाढली
- Ookla च्या स्पीड इंडेक्सच्या माहितीनुसार, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या भारतीय शहरात मोबाइल फिक्स्ड ब्रॉडबँड दोन्हीसाठी सरासरी स्पीड वाढली आहे.
वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो
- भातात मोबाइल इंटरनेट स्पीड रँकिंग नोव्हेंबर मध्ये १०५ झाली आहे. जी जानेवारी मध्ये ६९ व्या स्थानावर तर फेब्रुवारी मध्ये ६७ व्या स्थानावर होती. मोबाइलची सरासरी इंटरनेट स्पीड मध्ये सुधारणा होऊन 5G नेटवर्क मुळे हे शक्य झाल्याचे दिसत आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
- एप्रिल स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स नुसार, ग्लोबली भारत सर्वात वेगवान स्पीड ग्रोथचा देश बनला आहे. कतर हा देश मोबाइल स्पीडमध्ये जगातील टॉपचा देश बनला आहे. तर बहरीन १४ स्पॉटच्या झेपेसह सर्वात जास्त ग्रोथ मिळवणारा देश बनला आहे.
वाचाः Google Search चे एक्सपर्ट व्हाल, फक्त ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स करा फॉलो