नवी दिल्ली : Google will delete inActive Gmail Accounts : ई-मेल खातं म्हणलं की ते गुगलचं जी-मेलच असतं. इतरही कंपन्यांचे ई-मेल अकाउंट असले, तरी गुगलचं जी-मेल सर्वाधिक वापरलं जातं. कोट्यवधी लोकांचे गुगलवर अर्थात जी-मेल अकाउंट आहे. पण यातील अनेकजण आपले जुने अकाउंट्स वापरत नाहीत, ज्यामुळे गुगल आता निष्क्रिय अर्थात इनॅक्टिव्ह खाती हटवण्याची योजना आखली आहे. मंगळवारी (१६ मे २०२३) Google ने डिसेंबर २०२३ पासून हीी निष्क्रिय खाती हटवणार असल्याची माहिती दिली आहे.गुगलच्या वरिष्ठ आणि विश्वासू सूत्रांकडून जी-मेलची जी खाती दोन वर्षांपासून वापरली जात नाहीत म्हणजेच निष्क्रिय आहेत, ती सुरक्षेच्या दृष्टीने आणि हॅक होण्यापासून वाचवण्याच्या दृष्टीने कायमची हटवली जाणार आहेत. कंपनीने सांगितले की, जर एखादे Google खाते किमान दोन वर्षांपासून साइन इन केले नसेल आणि वापरले जात नसेल तर ते खाते हटविले जाऊ शकते. Google Workspace व्यतिरिक्त, Gmail, Docs, Drive, Meet आणि Calendar, YouTube आणि Google Photos वरील डेटाही हटवला जाणार आहे. Google चा हा नवा नियम पर्सनल Google खात्यांसाठी केला जाणार आहे. शाळा किंवा कंपन्यांसारख्या संस्थांसाठी हा नियम लागू नसेल अशीही माहिती समोर येत आहे. २०२० मध्ये Google ने सांगितले होते की निष्क्रिय खात्यांमधून डेटा डिलीट होईल पण अकाउंट डिलीट होणार नाही. पण आता कंपनीच्या म्हणण्यानुसार अकाउंट्सही डिलीट केली जाणार आहेत.
ट्विटरची जुनी खातीही होणार डिलीट
ई-मेल कंपन्यांमध्ये जी-मेल ज्याप्रमाणे महत्त्वाचं आहे, तसंच सोशल मीडिया अकाउंट्समध्ये ट्विटर अगदी महत्त्वाचं असून काही काळापूर्वी एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यावर त्यात बरेच बदल केले. मस्क यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की ट्विटरवर अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेली खाती हटवली जाणार आहेत.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन