‘मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे काढण्यापेक्षा…’, अशोक चव्हाण यांची भाजपवर खोचक टीका

हायलाइट्स:

  • ‘मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे काढण्यापेक्षा…’
  • ‘आरक्षणाचं श्रेय तुम्ही घ्या पण आरक्षणाचा मार्ग मोकळा’
  • अशोक चव्हाण यांची भाजपवर खोचक टीका

नांदेड : खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी २० जुलैला अशोक चव्हाण यांच्या घरावर मुक मोर्चा काढू असं वक्तव्य केल्यानंतर यावर अशोक चव्हाण यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलन, मोर्चे काढण्यापेक्षा केंद्र सरकारने ५० टक्क्यांची अट शिथिल करावी म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असं मत व्यक्त केलं आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

सभागृहात युपीए आणि घटक पक्षांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. मात्र, भाजपचा एकही खासदाराने पाठींबा दिला नाही. आरक्षणाचं श्रेय तुम्ही घ्या पण आरक्षणाचा मार्ग मोकळा करा असं केंद्र सरकारवर आणि मोर्चा काढणाऱ्यांवर अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पुण्यात ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारण वाचून चिंता वाढेल…
दोन वर्षांपासून करोनामुळे राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी आरोग्य विभागाकडे वळवला आहे. त्यामुळे आर्थिक संकट असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. अर्थ विभागाकडे बांधकाम विभागाचे आठ हजार कोटी अडकले आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बारा आमदारांच्या नियुक्तीवर बोलताना उच्च न्यायालयाने हे प्रकरण लवकर निकाली काढावे असं म्हटलं आहे. त्यामुळे ते लक्षात घेऊन राजपाल हा प्रश्न निकाली काढतील अशी अपेक्षा असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
निवडणुकीसाठी राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, ‘या’ जिल्ह्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

Source link

Ashok Chavanbjpmaratha reservation casemaratha reservation in maharashtramaratha reservation newsmaratha reservation news livemaratha reservation news supreme courtmaratha reservation news todaymaratha reservation percentage
Comments (0)
Add Comment