मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सॲपने आयओएससारखा मेन्यू अँड्रॉइड मध्ये आता उपलब्ध करून दिला आहे. Android 2.23.10.6 हे अपडेट इन्स्टॉल करणाऱ्या बीटा टेस्टर्सला हा नवा इंटरफेस दिसणार आहे. आता या नव्या इंटरफेसनुसार अँड्रॉईडमध्ये खालच्या बाजूला नेविगेशन बार दिसणार आहे. व्हॉट्सॲप अपडेट्सची माहिती देणाऱ्या WABetainfo ने देखील हे कन्फर्म केलं आहे की हा बदल करण्यासाठी व्हॉट्सॲप कंपनी मेन्यू लवकरच रिडिझाईन करणार आहे. मेटाने अशाप्रकारे अँड्रॉईड आणि आयओएस यांच्या व्हॉट्सॲपचा इंटरफेस बदलण्यामागे काही कारणं आहेत. आजकाल अँड्रॉईड फोनचा डिस्प्लेही मोठा येत असल्याने खालील मेन्यू अँड्रॉईड युजर्स आता अगदी आयफोनप्रमाणे वापरणार आहेत.
व्हॉट्सॲपचे चॅट आणखी सुरक्षित होणार
व्हॉट्सॲपचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आता कंपनी खास फीचर आणत आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलचा पासवर्ड एखाद्याला माहीत असेल तरी तुमचे व्हॉट्सॲपवरचे चॅट सुरक्षित राहणार आहेत. कारण व्हॉट्सॲपने एक नवीन गोपनीय फिचर आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर असलेले मेसेज लॉक करून ठेवू शकता. या नव्या फिचरचे नाव Chat Lock असे आहे. विशेष म्हणजे केवळ वैयक्तिकच नाही तर ग्रुप चॅट साठी सुद्धा लॉकचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे चॅट तुम्ही एखाद्या फोल्डर मध्ये save करू शकता.
वाचा : Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान