corona in maharashtra करोना: राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित वाढ; पाहा, ताजी स्थिती!

मुंबई: राज्यातील करोनाची (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असली ती गेल्या अनेक दिवसांपासून कमी न होता स्थिर आहे. आज झालेल्या मृत्यूंची संख्या कालच्या तुलनेत काहीशी कमी असली तरी ती आटोक्यात आल्याचे चित्र नाही. यांमुळे राज्यात काहीशी चिंतेचीच स्थिती कायम आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण १५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०८ इतकी होती. तसेच आज दिवसभरात ६ हजार ६८६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज एकूण ५ हजार ८६१ इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 6686 new cases in a day with 5861 patients recovered and 158 deaths today)

आज राज्यात झालेल्या १५८ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- पंकजा मुंडेंची नाराजी दूर?; कराडांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला दाखवणार हिरवा झेंडा

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित वाढ

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार ००४ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ५२२ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ६ हजार ६६९ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ०६८ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ३५९ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ४ हजार ८१० इतके रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘मराठा आरक्षणासाठी यापुढे मूक नव्हे, तर दंडुके घेऊन ठोक मोर्चा काढणार’

मुंबईत ३१३७ सक्रिय रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ही सख्या ३ हजार १३७ इतकी आहे. तर, रायगडमध्ये १ हजार २९०, रत्नागिरीत १ हजार ६८२, सिंधुदुर्गात १ हजार ४८४, बीडमध्ये १ हजार ५६९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९११ इतकी आहे.

भंडारा नंदुरबारमध्ये प्रत्येकी फक्त १ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५४९, नांदेडमध्ये ही संख्या ५१ इतकी आहे. जळगावमध्ये ३०७,नागपूर जिल्ह्यात ही संख्या २७९ इतकी झाली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ इतकी झाली आहे. तसेच अमरावतीत ही संख्या ५७ वर खाली आली आहे. नंदुरबार आणि भंडारा जिल्ह्यात ही संख्या प्रत्येकी १ इतकी आहे. धुळ्यात ही संख्या ४ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या भंडारा आणि नंदुरबार जिल्ह्यांत आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ वर आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई ते कोकण राजकीय झंझावात; नारायण राणेंची ‘जन आशीर्वाद’ यात्रा ठरली

३,७०,८९० व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ०५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

corona updatescoronavirus in maharashtraCoronavirus latest updatescovid-19करोनाकरोना अपडेटकोविड-१९महाराष्ट्रातील करोनाची स्थिती
Comments (0)
Add Comment