Jio and Airtel Plans : दिवसभर सोशल मीडिया वापरता? दमदार डेटासह बेस्ट आहेत ‘हे’ जिओ आणि एअरटेलचे प्लान

नवी दिल्ली :Airtel and Jio Recharge Offer : सध्या भारतातील आघाडीच्या दोन टेलिकॉम कंपन्या म्हणाल तर रिलायन्स जिओ आणि एअरटेल याच आहेत. या दोघांनीच सर्वात आधी ५जी नेटवर्क आणलं असून इतर कोणाकडेही अद्याप हे नेटवर्क नाही. त्यामुळे हे दोन्ही भारतातील दोन प्रमुख दूरसंचार ऑपरेटर आहेत. दोन्ही कंपन्या अमर्यादित डेटा प्रवेशासह अनेक प्रीपेड योजना ऑफर करतात. दोन्ही कंपन्या युजर्सच्या गरजेनुसार कमी आणि अधिक डेटा प्लान ऑफर करतात. आजच्या युगात आपण सर्वतजण इंटरनेटचा प्रचंड वापर करत आहो. इन्स्टाग्रामवर रील्स आणि यूट्यूबवर शॉर्ट्स पाहण्यातही आपला भरपूर डेटा जातो. यामुळे, बरेच वापरकर्ते दररोज अधिक जीबी डेटा मिळेल असे पॅक्स घेतात. Airtel आणि Jio दोन्ही ३० दिवसांपासून ते १ वर्षाच्या वैधतेसह 2.5GB दैनिक डेटा प्लान ऑफर करतात. तर दोघांचे असेच काही खास रिचार्ज पाहूया…

एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, 100 SMS दिवसाला मिळतात. हा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. अतिरिक्त फायदे म्हणून, Amazon प्राइम मेंबरशिप आणि एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप इत्यादींचा ॲक्सेस ८४ दिवसांसाठी कंपनीकडून दिला जात आहे.

एअरटेलचा ३३५९ रुपयांचा प्लॅन
हा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 2.5GB डेटा दर दिवसाला, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दिवसाला मिळत आहेत. या प्लानच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये डिस्नी + हॉटस्टार मोबाइल सदस्यत्व १ वर्षासाठी आणि अपोलो 24|7 सेवाही उपलब्ध आहे.

जिओचा ३४९ रुपयांचा प्लान
हा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दिवसाला 100 SMS मिळतात. अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV, JioCinema, JioCinema आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे सदस्यत्व देखील मिळत आहे.

जिओचा ८९९ रुपयांचा प्लॅन
हा प्लान ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दिवसाला 100 SMS मिळत आहेत. अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV, JioCinema, JioCinema आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे सदस्यत्व मिळत आहे.

वाचाः आता WhatsApp चॅट iPhone मधून Android मध्ये लगचेचच करता येणार ट्रान्सफर, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Source link

5g plansAirteljiojio 5gjio plansmobile rechargeएअरटेलजिओ५जी रिचार्ज
Comments (0)
Add Comment