jan ashirwad yatra: पंकजा मुंडेंची नाराजी झाली दूर?; कराड यांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला पंकजाच दाखवणार हिरवा झेंडा

हायलाइट्स:

  • भागवत कराड यांची ही यात्रा औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातून जाणार आहे.
  • कराड यांची ही यात्रा गोपीनाथ गडावरून सुरू करण्यात येणार आहे.
  • विशेष म्हणजे कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला खुद्द पंकजा मुंडे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

बीड: भारतीय जनता पक्षाने आपल्या केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू करत जनतेशी संवाद साधणारा नवा कार्यक्रम सुरू केला आहे. यांपैकी नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्राही आयोजित करण्यात आली आहे. कराड यांची ही यात्रा औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातून जाणार आहे. कराड यांची ही यात्रा गोपीनाथ गडावरून सुरू करण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर विशेष म्हणजे कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला खुद्द पंकजा मुंडे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांची कथित नाराजी दूर झाली असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (pankaja munde is going to show the green flag to bhagwat karad jan ashirwad yatra)

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा १६ ऑगस्ट या दिवशी परळी येथील गोपीनाथ गडावरून सुरू होईल. पंकजा मुंडे या यात्रेला उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते या यात्रेचा आरंभ होणार आहे. ही माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भागवत कराड यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात होते. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये मोठी नाराजी असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळेच भागवत कराड आपली जन आशीर्वाद यात्रा घेऊन बीडमध्ये येणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र, आता पंकजा मुंडे यांच्याच हस्ते त्यांच्या यात्रेता शुभारंभ होणार असल्याचे मुंडे यांची नाराजी दूर झाली का?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘मराठा आरक्षणासाठी यापुढे मूक नव्हे, तर दंडुके घेऊन ठोक मोर्चा काढणार’

भागवत कराड यांच्या या यात्रेसाठी पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी, १६ ऑगस्ट रोजी पंकजामुंडे या बीडमध्ये एका कार्यशाळेत उपस्थित राहणार आहेत. तेव्हा त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा सत्कारही करण्यात आला. यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा अधिकच होऊ लागली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई ते कोकण राजकीय झंझावात; नारायण राणेंची ‘जन आशीर्वाद’ यात्रा ठरली
क्लिक करा आणि वाचा- १० दिवसात बीडीडी चाळ पुनर्वसनाचे काम सुरू होणार; गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा

Source link

Bhagwat KaradJan Ashirwad YatraPankaja Mundeजन आशीर्वाद यात्रापंकजा मुंडेभागवत कराड
Comments (0)
Add Comment