नवतपा प्रारंभ
सूर्य ज्यावेळी रोहिणी नक्षत्रात १५ दिवसांसाठी येतो, त्यावेळी त्या १५ दिवसामधील सुरुवातीचे ९ दिवस नवतपा म्हटले जातात. या ९ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे पाऊस आणि थंड वारं नसल्यास मान्सूनमध्ये चांगला पाऊस येणार असे मानले जाते. यावर्षी नवतपा २२ मे पासून सुरू होणार आहे. सूर्य ५ जूनपर्यंत रोहिणी नक्षत्रात राहणार असल्याने ५ जूननंतरच नवतपाची समाप्ती होईल.
Vat Purnima 2023: वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घेऊया तिथी, मुहूर्त, आणि महत्व
नवतपा म्हणजे काय?
सूर्य १२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये प्रवास करत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य कुंडलीत ज्या ग्रहांबरोबर बसतो, त्याचा प्रभाव कमी करून देतो. रोहिणी नक्षत्राचे अधिपती चंद्रमा आहे. अश्या वेळी जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो चंद्राचा थंडावा संपवून उष्णता वाढवतो. त्यामुळे पृथ्वीला थंडावा मिळत नाही आणि उष्णता प्रचंड वाढते. नवतपाच्या वेळी सूर्य किरणं थेट पृथ्वीवर येतात ज्यामुळे तापमानात वाढ होते.
नवतपाच्या वेळी सूर्याची उपासना केल्याने व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील सर्व ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. सूर्य आणि चंद्र या दोन्ही दृश्य देवतांमध्ये मागील जन्मांच्या पापांपासून मुक्त होण्याची शक्ती आहे. सूर्य आणि चंद्र यांना जल अर्पण करून व नमस्कार केल्यानेच आपण भवसागरातून मुक्त होऊ शकतो.
जून महिन्यात सूर्य, शनिसोबत या ग्रहांचे राशीपरिवर्तन; या ५ राशींच्या लोकांना धनलाभासोबत मिळेल पदोन्नती