WhatsApp चॅटिंगची मजा आणखी वाढणार, आता ॲपच्या आतच तयार करता येणार स्टिकर्स, खास फीचर आलं समोर

नवी दिल्ली :WhatsApp chat features : काही वर्षांपूर्वी चॅटिंग म्हणजे फक्त साधे टेक्स्ट मेसेज करणं, असच होतं. पण मागील काही वर्षात व्हिडिओ, गिफ, फोटो या सर्वाचा चॅटिंगमध्ये वापर होऊ लागला आहे. आता कंपनीनं एक खास फीचर आणलं असून यामुळे आता व्हॉट्सॲपमध्येच स्टिकर तयार करता येणार आहेत. सध्या हे नवं फीचर ios अर्थात ॲपल फोन्ससाठी येणार आहे.
कंपनी सध्या या फीचरवर जोमात काम करत आहे. व्हॉट्सॲपच्या विविध अपडेट्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetaInfo ने एक स्क्रिनशॉट शेअर केला असून या स्क्रिनशॉटमधून या नव्या अपडेटची झलक दिसून येत आहे. या स्टीकर संबधित अपडेटबद्दल समोर येणाऱ्या माहितीत दिसून येत आहे की, युजर्स आपल्या फोटोंमधूनच स्टीकर तयार करु शकणार आहेत.

वाचा : WhatsApp Tips: आता एकाच स्मार्टफोनमध्ये चालवू शकता दोन व्हॉट्सॲप अकाऊंट, फक्त या सोप्या स्टेप्स करा फॉलो

असं तयार करता येणार स्टीकर
या फीचरनुसार एखाद्या इमेजमधून हवं ते सब्जेक्च एक्सट्रॅक्ट करण्यासाठी ios 16 च्या API चा उपयोग होईल. एक्सट्रॅक्शननंतर ऑटोमेटिकली ॲपमध्येच स्टिकर तयार होणार आहे. यासाठी कंपनी शेअर ॲक्शन शीटमध्ये ‘New Sticker’ ऑप्शन देत आहे. यावर क्लिक केल्यानंतर युजर डिव्हाईसच्या इमेज लायब्ररीमध्ये पोहोचेल त्यात बॅकग्राऊंड काढून फोटो एडिट करण्याचा ऑप्शनही देतो.

आता ऑनलाईन स्टेटसही लपवता येणार

व्हॉट्सॲप युजर्सला आणखी सुविधा पुरवण्यासाठी नवनवीन अपडेट्स आणत असते. आताही त्यांनी ऑनलाइन स्टेटस लपवण्याची खास सुविधा आणली आहे. हे फीचर नवीन प्रायव्हसी फीचर अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या फीचरमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकता, त्यानंतर तुमचे ऑनलाइन स्टेटस तुमच्या कॉन्टॅक्ट्सना देखील दिसणार नाही. म्हणजेच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकता. हे फीचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

android whatsappios whatsappWhatsAppWhatsApp featurewhatsapp newswhatsapp stickersव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप ट्रीकस्टीकर्स फीचर
Comments (0)
Add Comment