Solar AC: तुमच्या एसीला आता इलेक्ट्रीसिटीचं टेन्शन नाही, वाढील लाईट बिलापासूनही सुटका

नवी दिल्ली :Solar AC Price and Specs : उन्हाळा सुरू होताच अनेक भागात वीजकपात सुरु होते. लोडशेडिंगचा टाईम वाढू लागतात. अनेक ठिकाणच्या नागरिकांना लो व्होल्टेजच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात एसीसारखी उपकरणं चालणं कठीण होतं. पण गर्मी खूप असल्याने एसीची गरजही खूप असते, अशा परिस्थितीत सोलार एसी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, सामान्य एसीपेक्षा सोलार एसी घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. पण ही एकवेळची गुंतवणूक आहे. सोलार एसी एकदाच लावावा लागतो. ज्यानंतर इलेक्ट्रीसिटीच्या टेन्शनपासून तुमची सुटका होईल.वीज बिलापासून सुटका
सौरऊर्जेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे आपलं वीज बिल मोठ्या प्रमाणात वाचतं. एकदा सोलार एसी बसवल्यानंतर, तुम्ही सुमारे २० ते २५ वर्षे वीजबिलाशिवाय एसी चालवू शकता.

अनेक प्रकारचे एसी मार्केटमध्ये
बाजारात अनेक प्रकारचे सोलार एसी उपलब्ध आहेत. हे AC ०.८ टन, १ टन आणि १.५ टन आणि २ टन क्षमतेचे आहेत. तसेच, सोलार एसी विंडो आणि स्प्लिट एसी अशा दोन्ही पर्यायांमध्ये येतात. अशा परिस्थितीत तुम्ही आपल्या खोलीनुसार एसी निवडू शकतात. उन्हाळ्यात एसी साधारणपणे दररोज १४-१५ तास चालतात. ज्यामुळे सुमारे २० युनिट्स लाईट्स वापरली जाते. तर ३० दिवस बघितले तर महिनाभर ६०० युनिट्स खर्च होतात. अशा परिस्थितीत एसीचाच एका महिन्याचा खर्च सुमारे साडेचार हजार रुपये होतो. सोलार एसीमुळे हे पैसे वाचू शकतात.

सोलार एसीची किंमत
आता सोलार एसीच्या किंमतीचा विचार केला तर १ टन सोलर एसीची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. याच १.५ टन सोलर एसीची किंमत २ लाख रुपये आहे. तथापि, वेगवेगळ्या ठिकाणी किंमतीत फरक दिसून येऊ शकतो.

वाचा : WhatsApp चॅटिंगची मजा आणखी वाढणार, आता ॲपच्या आतच तयार करता येणार स्टिकर्स, खास फीचर आलं समोर

Source link

air conditionelectricitySolar ACsolar ac priceसोलार एसीसोलार एसी फायदे
Comments (0)
Add Comment