मंगळ ग्रहावर कोण वाचतंय पुस्तक!, Nasa च्या रोवरने काढला हैराण करणारा फोटो

पृथ्वीच्या बाहेर जीवनाची शक्यता आहे का? याचा शोध घेत असलेले वैज्ञानिक मंगळ ग्रहावर चाचपणी करीत आहेत. अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाने लाल ग्रहावर अनेक मिशन पाठवले आहेत. त्यातील एक आहे नासाचे Curiosity Mars rover. गेल्या महिन्यात १५ तारखेला ज्यावेळी क्यूरियोसिटी रोव्हरच्या लाल ग्रहावर ३८०० वा मंगळ दिवस होता. एक फोटो घेतला होता. हा फोटो एक उंच कडा अर्थात दगडासारखा आहे. ज्याला Terra Firme म्हटले जाते. टेरा फिरमे एखाद्या पुस्तक उघडलेल्या पानासारखा वाटत आहे. फोटोला मार्स हँड लेन्स इमेजर (MAHLI) च्या मदतीने कॅप्चर करण्यात आले आहे. याची साइज २.५ सेंटीमीटर इतकी आहे.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या माहितीनुसार, असामान्य दिसणारी ही वस्तू मंगळ ग्रहावर कधी कधी दिसते. नासाच्या म्हणण्यानुसार, या प्रकारच्या दगडाचा आकार खूप वर्षानंतर तसेच भूतकाळात पाण्याच्या प्रवाहाने झालेला आहे. मंगळ ग्रहाच्या विविध परिसरात याप्रकारचे दगड मिळतात. यावरून हे समजू शकते की, कधी काळी या ग्रहावर पाणी येत होते.

वाचाः WhatsApp चॅटिंगची मजा आणखी वाढणार, आता ॲपच्या आतच तयार करता येणार स्टिकर्स, खास फीचर आलं समोर

नासाच्या क्यूरियोसिटी मार्स रोवर २०१२ मध्ये ऑगस्ट महिन्यात मंगळ ग्रहावर पोहोचले होते. हे कारच्या आकाराची एक मोबाइल लॅब आहे. क्यूरियोसीटी मार्स रोवरचा उद्देश मंगळ ग्रहाची जलवायू, जियोलॉजी आदीची माहिती उघड करणे आहे. हे जाणून घेणे असते की भूतकाळात हे ग्रह जीवनासाठी किती अनुकूल होते. तसेच भविष्यात याची काय शक्यता आहे. क्यूरियोसिटी मार्स रोवर मध्ये अनेक आधुनिक उपकरणे लावले आहेत. ज्यात कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर आणि सेन्सरचा समावेश आहे. जो डेटा हे रोवरसी जोडलेला आहे. यामुळे वैज्ञानिकांना या ग्रहाचा इतिहास आणि डेव्हलपमेंटला समजून घेण्यास मदत मिळेल.

वाचाः Solar AC: तुमच्या एसीला आता इलेक्ट्रीसिटीचं टेन्शन नाही, वाढील लाईट बिलापासूनही सुटका

Source link

Curiosity Mars RoverCuriosity Mars Rover picsMAHLINasanasa curiosity rovernasa mars missionक्यूरियोसिटी मार्स रोवरनासाची मंगळ मोहीम
Comments (0)
Add Comment