SSC HSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत जाहीर होणार असून, बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल १० जूनपूर्वी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष यंदाही पूर्ववत करण्याची सरकारकडे संधी आहे. दरम्यान निकाल लागल्यावर कशापद्धतीने तपासायचा? याची माहिती घेऊया.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. यासाठी तुम्हाला बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येईल. महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्हाला यासंदर्भातील प्रत्येक अपडेट पाहता येणार आहे.

कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org/
https://hsc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
SSC Result 2023: असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी/बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी/बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.