वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो
आज पृथ्वीच्या जवळ येणार्या तीनही लघुग्रहांची प्रारंभिक संख्या २०२३ आहे. म्हणजेच यावर्षी त्यांचा शोध लागला आहे. यापैकी 2023 KS नावाचा लघुग्रह सर्वात आव्हानात्मक आहे. सुमारे ३६ फूट उंचीचा लघुग्रह बसएवढा मोठा असू शकतो. हा लघुग्रहांच्या अपोलो गटाचा एक भाग आहे. हा लघुग्रह आपली दिशा बदलून पृथ्वीवर आदळल्यास मोठं नुकसान घडू शकतं. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोट्यवधी वर्षांपूर्वी, लघुग्रहांच्या धडकेने झालेल्या विनाशामुळे डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले होते. आज पृथ्वीजवळ आणखी एक लघुग्रह आहे – (2023 JK3) जो सुमारे ९३ फूट रुंद म्हणजेच विमानाएवढा मोठा आहे. जेव्हा तो पृथ्वीच्या जवळ येईल तेव्हा दोघांमधील अंतर 6 लाख 22 हजार किलोमीटर असेल. हा एटेन लघुग्रहांचा भाग आहे.
या दोन लघुग्रहांशिवाय आज (2023 KQ) नावाचा आणखी एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहे. हा तीनपैकी सर्वात मोठा आहे, जे सुमारे ११० फूट याची उंची असू शकते. जेव्हा हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येईल तेव्हा दोघांमधील अंतर ५१ लाख ७० हजार किलोमीटर असेल. तिन्ही लघुग्रहांमुळे पृथ्वीला कोणतीही हानी होणार नाही, असा नासाचा आतापर्यंतचा अंदाज आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?