सॅमसंग गॅलेक्सी सीरीजचा स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, डिझाइनही प्रीमियम

सॅमसंग इंडियाने आपला नवीन फोन Samsung Galaxy A14 ला भारतात लाँच केले आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. याशिवाय, यात प्रीमियम डिझाइन दिली आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी सुद्धा दिली आहे. या फोनला चार कलर व्हेरियंट मध्ये मार्केटमध्ये आणले आहे. जाणून घ्या फोनची किंमत आणि फीचर्स संबंधी सर्वकाही.

Samsung Galaxy A14 ची किंमत
Galaxy A14 ची सुरुवातीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. या किंमतीत ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबीचे स्टोरेज मिळते. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला सॅमसंगच्या स्टोर आणि अन्य स्टोरवरून १ हजार रुपयाच्या कॅशबॅक सोबत खरेदी करता येऊ शकते. या फोनला ब्लॅक, लाइट ग्रीन आणि सिल्वर कलर मध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy A14 ची स्पेसिफिकेशन
Galaxy A14 सोबत ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ४ जीबी व्हर्च्युअल रॅम सुद्धा मिळते. या फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर सोबत ONE UI 5 आणि अँड्रॉयड १३ मिळतो. फोनला चार वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट आणि दोन वर्षापर्यंत ऑपरेटिंग सिस्टम अपडेट मिळणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर सेटअप दिले आहे.

वाचाः Latest Robot News : आता ऑफिसमध्ये रोबोट्सचा जलवा, अगदी मानवी मेंदूप्रमाणे करणार काम

ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. दुसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा आणि तिसरा लेन्स २ मेगापिक्सलचा मायक्रो दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कॅमेरा सोबत ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनचा सपोर्ट मिळत नाही. Galaxy A14 मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते. या फोनला एकदा फुल चार्ज केल्यानंतर दोन दिवस बॅटरी बॅकअप मिळतो, असा कंपनीचा दावा आहे.

वाचाः १९ हजाराचा Redmi Note 12 खरेदी करा फक्त १४ हजारात, पाहा ऑफर

Samsung Galaxy A 34 5G Unboxing : सिंगल चार्ज में दो दिन तक चलेगी बैटरी

Source link

Samsung Galaxy A14Samsung Galaxy A14 featuresSamsung Galaxy A14 launchedSamsung Galaxy A14 priceSamsung Galaxy A14 saleसॅमसंग स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment