तर आपण सर्वचजण मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲप वापरत असतो. अनेक महत्त्वाची कामंही यावर होत असतात. दिवसभर अनेकांना आपण अनेक मेसेज करत असल्याने कितीतरी वेळा चुकून चुकीचा मेसेज आपल्याकडून सेंट होतो. पण तो मेसेज बदलता येणार नसल्याने आपल्याला तो एकतर डिलीट फॉर एवरीवन करावं लागतं. समोरच्याला हे दिसतं देखील की आपण मेसेज डिलीट केला आहे. पण आता हा त्रास संपणार असून चुकून सेंट झालेला चुकीचा मेसेजही एडिट करता येणार आहे.
व्हॉट्सॲप एडिट मेसेज एक
तर या मेसेजिंग ॲपमध्ये पाठवला गेलेला कोणताही मेसेज हा सेंड केल्यानंतरही बदलता येणार आहे. त्यामुळे मेसेज डिलीट करण्याची गरज नसून अगदी सोप्या पद्धतीने फक्त एडिट करावा लागणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेसेज सेंट झाल्यावर केवळ १५ मिनिटांपर्यंतच हा एडिटचा ऑप्शन राहणार आहे. आता तुम्ही हे फीचर कसं वापरु शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स पाहा…
कसा कराल व्हॉट्सॲप मेसेज एडिट?
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेसेज फक्त १५ मिनिटापर्यंतच एडिट करता येणार असल्याने त्याची काळजी घ्यावी.
- तर व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट अपडेटनंतर कोणताही सेंट झालेला मेसेज एडिटचा ऑप्शन येणार आहे.
- यासाठी फक्त सेंट झालेल्या चुकीच्या मेसेजवर टॅप करुन होल्ड करावं लागेल, ज्यानंतर अनेक ऑप्शन दिसतील. मग Edit Message चा ऑप्शन दिसेल.
- Edit Message वर टॅप केल्यावर त्यात हवा तो बदल करु शकाल आणि पुन्हा सेंडवर टॅप करताच ओरिजनल मेसेजच्या जागी एडिटेड मेसेज सेंड होईल.
वाचा : Latest Robot News : आता ऑफिसमध्ये रोबोट्सचा जलवा, अगदी मानवी मेंदूप्रमाणे करणार काम