Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

नवी दिल्ली :Jio Data Booster Pack : सध्याच्या डिजीटल युगात इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे युजर्सना डेटा पॅक पुरत नाही. त्यात आयपीएल मॅचेससारख्या भव्य स्पर्धाही सर्वजण ऑनलाईन पाहत असल्याने डेटा फारच खर्च होतो. आता तुम्ही जिओ युजर असाल आणि तुम्हालाही अशाचप्रकारे डेटा पुरत नसेल तर कंपनीने एक खास रिचार्ज तुमच्यासाठी आणला आहे. जिओ डेटा बुस्टर पॅक असं या पॅकचं नाव असून यामध्ये युजर्सना डेटा सपंल्यावर रिचार्ज करताच आणखी डेटा मिळणार आहे.विशेष म्हणजे ६१ रुपयांच्या बुस्टर पॅकमध्ये ४ जीबी डेटा आता फ्री मिळत आहे, आधी ६ जीबी डेटा मिळायचा पण आता १० जीबी डेटा मिळणार आहे. कंपनीने १५, २५, १२१ आणि २२२ असे पॅकही देऊ केले आहेत. यातील १५ रुपयांच्या डेटा बुस्टर पॅकमध्ये १ जीबी डेटा मिळणार आहे. तर २५ रुपयांच्या पॅकमध्ये २ जीबी डेटा मिळेल. १२१ रुपयांच्या डेटा बुस्टर पॅकमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी १२ जीबी डेटा मिळणार असून २२२ हा सर्वात महागडा डेटा बुस्टर पॅक असून यामध्ये एकूण ५० जीबीपर्यंत डेटा मिळणार आहे.

वाचा : Latest Robot News : आता ऑफिसमध्ये रोबोट्सचा जलवा, अगदी मानवी मेंदूप्रमाणे करणार काम

एक वर्षाची वैधता असणारे दमदार प्लान्स
जिओ २८७८ आणि २९९८ असे दोन डेटा अॅड-ऑन पॅकही आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही डेटा अॅड ऑन पॅक ३६५ दिवसांच्या म्हणजेच तब्बल एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसह येतात. या दोन्ही पॅकमधील जर डेटाचा विचार केला तर २८७८ रुपयांच्या पॅकमध्ये दरदिवसाला २ जीबी डेटा मिळणार आहे. तर दुसरीकडे २८९८ रुपयांच्या पॅकमध्ये दिवसाला २.५ जीबी इतका डेटा मिळणार आहे. दरम्यान यातील निर्धारीत डेटा संपल्यावरही बुस्टर पॅक टाकता येणार आहे.

वाचा : WhatsApp वर चुकून चुकिचा मेसेज सेंड झाला, टेन्शन नको आता मेसेज सेंट झाल्यावरही करता येणार बदल

Source link

jiojio booster packjio rechargeReliance Jioजिओजिओ नेटजिओ बुस्टर पॅक
Comments (0)
Add Comment