कोणी किती जोडले नवीन यूजर्स
टेलीकॉम रेगुलेटर TRAI च्या आकडेवारीनुसार, जिओने मार्च २०२३ मध्ये ३०.५ लाख नवीन मोबाइल यूजर्स आपल्या सोबत जोडले आहेत. तर एअरटेल यामध्ये मागे आहे. या दरम्यान, एअरटेलने १०.३७ लाख नवीन ग्राहक जोडण्याचे काम केले आहे. तर मार्च २०२३ मध्ये वोडाफोन आयडियाने १२.१२ लाख ग्राहक संख्या गमावली आहे. वोडाफोन आयडियाच्या यूजर्स संख्येत लागोपाठ घसरण पाहायला मिळत आहे. तर एअरटेलच्या नवीन यूजर्स जोडण्याचा वेग जिओच्या तुलनेत स्लो आहे.
कोणाकडे किती मोबाइल यूजर्स
एअरटेल – ३७.०९ कोटी यूजर बेस
जिओ – ४३ कोटी यूजर बेस
वोडाफोन आयडिया २३.७९ कोटी
वाचाः अरे बाप रे! ३१ हजार किमीच्या स्पीडने ‘विध्वंसक’ पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, धोका वाढला
फेब्रुवारीत कशी होती आकडेवारी
फेब्रुवारी २०२३ मध्ये रिलायन्स जिओने जवळपास १० लाख नवीन ग्राहक आपल्या सोबत जोडले होते. तर एअरटेलने फेब्रुवारी मध्ये ९.८२ लाख नवीन मोबाइल यूजर्स जोडले होते. परंतु, मार्च मध्ये हे अंतर खूप वाढले. ब्रॉडबँड यूजर्सच्या संख्येत वाढ नोंदली गेली आहे. फेब्रुवारी २०२३ च्या अखेर मध्ये ८९३.३३ मिलियन यूजर्स होते. ही आकडेवारी मार्च २०२३ मध्ये वाढून ८४६.५७ मिलियन झाली आहे.
वाचाः ६० हजार रुपये किंमतीचा Lenovo Laptop खरेदी करा फक्त २० हजारात, २ वर्षाची वॉरंटीही
ब्रॉडबँड यूजर्स
रिलायन्स जिओ ४३.८५ कोटी
भारती एअरटेल २४.१९ कोटी
वोडाफोन आयडिया १२.४८ कोटी
वाचाः OnePlus 10R : वनप्लसच्या दमदार फोनवर दमदार डिस्काउंट! ४० हजारांचा फोन २९ हजाराला