नवी दिल्ली :Bill gates on AI : आजकाल सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे चॅटबॉट ChatGPT च्या वाढत्या वापरामुळे सर्वांना AI ची झलक दिसत असून भविष्यात अनेकांच्या नोकऱ्या हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खाणार, असंही म्हटलं जात आहे. ज्यात आता मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भविष्याबद्दल भाष्य केलं आहे. त्यांच्या मते, हे कृत्रिम बुद्धिमत्ता एजंट अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे गुगलसारखे सर्च इंजिन, ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट्स साऱ्यांचाच भविष्य धोक्यात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोक आता या साईट्सना भेट न देताही आपलं काम करुन घेऊ शकतात असं मत गेट्स यांनी वर्तवलं आहे. त्यांनी आपल्या कंपनीबाबत बोलताना सांगितलं की जर मायक्रोसॉफ्ट या एआय शर्यतीत यशस्वी झालं नाही तर ते त्यांच्यासाठी निराशादायक असेल, ते AI Forward 2023 या कार्यक्रमात बोलत होते.
बिल गेट्स इन्फ्लेक्शन एआयने प्रभावित
बिल गेट्स म्हणाले की, कोणत्याही स्टार्टअपच या AI क्षेत्राच्या शीर्षस्थानी पोहोचण्याची ५०% शक्यता असते आणि जो कोणी या टप्प्यावर पोहोचेल ती एक महत्त्वपूर्ण कामगिरी असेल. रीड हॉफमनने स्थापन केलेल्या इन्फ्लेक्शन एआयने आपल्याला प्रभावित केल्याचं ते म्हणाले.
बिल गेट्स इन्फ्लेक्शन एआयने प्रभावित
बिल गेट्स म्हणाले की, कोणत्याही स्टार्टअपच या AI क्षेत्राच्या शीर्षस्थानी पोहोचण्याची ५०% शक्यता असते आणि जो कोणी या टप्प्यावर पोहोचेल ती एक महत्त्वपूर्ण कामगिरी असेल. रीड हॉफमनने स्थापन केलेल्या इन्फ्लेक्शन एआयने आपल्याला प्रभावित केल्याचं ते म्हणाले.
वाचा : WhatsApp वर चुकून चुकिचा मेसेज सेंड झाला, टेन्शन नको आता मेसेज सेंट झाल्यावरही करता येणार बदल
AI चे कौतुक
बिल गेट्स यांनी एआय आणि त्याच्या फायद्यांबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी चॅटजीपीटीचं कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते की चॅटबॉटमुळे कार्यालयीन कामे सुलभ होतील. गेट्स म्हणाले की ChatGPT भविष्य काय आहे? याची झलक देते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक मोठी क्रांती आहे, असंही ते म्हणाले.
वाचा : Latest Robot News : आता ऑफिसमध्ये रोबोट्सचा जलवा, अगदी मानवी मेंदूप्रमाणे करणार काम