मोटोरोलाचा नवा फोन लाँच, प्री बुकिंग सुरू, ३० मे पासून विक्री, ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

मोटोरोलाने आपला नवीन फोन Motorola Edge 40 ला भारतात लाँच केले आहे. काही दिवसांपूर्वीच Motorola Edge 40 ला यूरोप , लॅटिन, अमेरिका आणि अन्य देशात लाँच केले होते. भारतीय बाजारात या फोनला फक्त एकाच व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 8020 प्रोसेसर दिले आहे. तसेच या फोनला तीन कलर मध्ये मार्केटमध्ये आणले आहे.

फोनची किंमत
या फोनला एकाच व्हेरियंट मध्ये म्हणजे ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजमध्ये आणले आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून ३० मे पासून सुरू केली जाणार आहे. सध्या या फोनची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या फोन सोबत २ हजार रुपयाची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. या फोनला एक्लिप्स ब्लॅक, लुनार ब्लॅक आणि नेबूला ग्रीन कलर मध्ये खरेदी करता येऊ शकते.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

फोनची फीचर्स
मोटोच्या या फोनमध्ये ड्युअल सीम सोबत अँड्रॉयड १३ मिळते. फोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस pOLED स्क्रीन दिली आहे. डिस्प्ले सोबत 144Hz चा रिफ्रेश रेट आणि 360Hz चा टच सँम्पलिंग रेट मिळतो. डिस्प्लेचा पिक ब्राइटनेस १२०० निट्स आहे. डिस्प्ले सोबत HDR10+ चे सर्टिफिकेशन मिळते. फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 8020 प्रोसेसर सोबत 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB चे UFS 3.1 स्टोरेज दिले आहे.

वाचाः दमदार बॅटरीचे ३ नवे स्मार्टफोन बाजारात, Infinix Note 30 सिरीजची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचा आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन OIS मिळते. दुसरा लेन्स १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते. सोबत 68W TurboPower वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.

वाचाः AI आता पुढील भविष्य, गुगल आणि अमेझॉनसाठी घोक्याची घंटाः बिल गेट्स

Source link

Motorola Edge 40Motorola Edge 40 LaunchedMotorola Edge 40 Launched in Indiamotorola edge 40 pricemotorola edge 40 pro first salemotorola edge 40 sale
Comments (0)
Add Comment