कुटुंब कलहाची कारणे
कौटुंबिक वादामागे कोणतेही ठोस कारण नसले तरी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तणावाचे वातावरण निर्माण होते आणि आनंद शांतता भंग पावते. घरातील अशा वातावरणामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच घरातील मुलांवरही याचा विपरीत परिणाम होतो. अशाप्रकारे पितृदोष किंवा ग्रहदोष यामागचे मुख्य कारण असू शकते. म्हणूनच हे ज्योतिष उपाय तुम्हाला कौटुंबिक कलह दूर करण्यास मदत करू शकतात.
या उपायाने घरातील नकारात्मकता होईल दूर
ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमच्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये, पती पत्नीमध्ये किंवा शेजाऱ्यांसोबत वाद होत असेल तर दररोज सकाळी मिठाच्या पाण्याने घर पुसून टाका. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. यासोबतच घरातील वास्तुदोषही कमी होतात. पण लक्षात ठेवा गुरुवार आणि शुक्रवारी मिठाच्या पाण्याने लादी पुसू नका, असे करणे शुभ मानले जात नाही.
या उपायाने ग्रहदोष होतील दूर
ग्रह-नक्षत्रांमुळे घरात वाद होत राहतात, त्यामुळे एकदातरी नवग्रहाची पूजा घरात करावी. असे केल्याने कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहते आणि कुंडलीत उपस्थित असलेल्या सर्व ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात. यासोबतच कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. नवग्रहाच्या पूजेमध्ये ज्योतिषीय मार्गदर्शन घ्यावे.
या उपायाने पित्रांचा आशीर्वाद मिळतो
अमावस्या किंवा श्राद्ध पक्षात पितरांना तर्पण किंवा अन्न अर्पण करावे आणि प्रत्येक शुभ कार्यात पितरांचे ध्यान करावे. तसेच कावळे, कुत्रे, गायी, पक्ष्यांना धान्य आणि मुंग्यांना पीठ खाऊ घालावे. पिंपळ किंवा वटवृक्षाला पाणी अर्पण करत राहा. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती आणि प्रगती राहते. यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते.
या उपायाने नवरा-बायकोमध्ये प्रेम वाढेल
नवरा-बायकोमध्ये अनेकदा भांडण होत असेल तर पत्नीने रात्री झोपण्यापूर्वी पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी तो जाळून टाकावा आणि नंतर ती राख वाहत्या पाण्यात टाकावी. असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते आणि नातेही घट्ट होते. त्याचबरोबर घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज साजूक तुपाचा दिवा लावावा.
या उपायाने अडचणी होतील दूर
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करा. सकाळ-संध्याकाळ हनुमानासमोर पंचमुखी दिवा लावा आणि अष्टगंध लावून त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. या उपायाने मुलांना आजार, शिक्षणातील अडथळे, वाद इत्यादीपासून मुक्ती मिळते.
असे करू नका
अनेकांना पलंगावर जेवण्याची सवय असते, असे करणे अशुभ मानले जाते. तसेच जे लोक किचनमध्ये उष्टी भांडी ठेवतात, बाहेरचे बुट, चप्पल घरात आणतात, ते घरात अनेक समस्यांना आमंत्रण देतात. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, अंथरुणावर जेवण करू नये, घरात बाहेरचे बुट आणि चप्पल आणू नका आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.