Redmi A2, Redmi A2+ स्मार्टफोनची विक्री भारतात सुरू, किंमत फक्त ६,२९९ रुपये

नवी दिल्ली :Redmi A2 and Redmi A2+ : बजेट स्मार्टफोन बनवण्यात आघाडीवर असणारी कंपनी Redmi ने नुकतेच १९ मे २०२३ रोजी भारतात परवडणाऱ्या किंमतीत एक नवी सिरीज लाँच केली. Redmi A2 असं या सिरीजचं नाव असून यातील Redmi A2 आणि Redmi A2+ हे दोन नवी मॉडेल्स आता आजपासून (२३ मे २०२३) विक्रीसाठी देखील उपलब्ध केले जात आहेत. Redmi A2 आणि Redmi A2+ स्मार्टफोन ६.५२ इंच IPS LCD स्क्रीन आणि 5000mAh बॅटरी सारख्या दमदार फीचर्ससह येतो. Redmi A2 सिरीजच्या नवीन फोनची किंमत, ऑफर्स आणि फीचर्सबद्दल सर्वकाही जाणून घेऊ…

Redmi A2, Redmi A2+ ची किंमत
Redmi A2 स्मार्टफोनच्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत केवळ ६,२९९ रुपये आहे. तर 2 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६,७९९ रुपयांना आणि 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट ७,९९९ रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. तसंच ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI द्वारे, 2 जीबी रॅम व्हेरिएंट ३०० रुपयांच्या सवलतीत आणि 4 जीबी रॅम व्हेरिएंट ५०० रुपयांच्या सवलतीत घेता येईल. त्याच वेळी, Redmi A2 चे सर्व प्रकार HDFC आणि Axis Bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI द्वारे ५०० रुपयांच्या सवलतीत घेता येऊ शकतो. Redmi A2+ व्हेरिएंटचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंट ८,४९९ रुपयांना लाँच करण्यात आला आहे. A2 मालिका क्लासिक ब्लॅक, ब्लू आणि सी ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे स्मार्टफोन Mi Store अॅप, Mi.com, Amazon India आणि ऑफलाइन स्टोअरद्वारे देखील विकत घेता येऊ शकतात. दोन्ही मॉडेल्स दोन वर्षांच्या वॉरंटीसह मिळत आहेत.

Redmi A2, Redmi A2+ चे स्पेसिफिकेशन्स
Redmi A2 आणि Redmi A2+ स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाची IPS LCD स्क्रीन आहे जी टीयरड्रॉप नॉचसह येते. डिस्प्ले 1600 x 720 पिक्सेलच्या HD+ रिझोल्यूशनसह येतो आणि त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे आणि टच सॅम्पलिंग दर 120 Hz आहे. Redmi A2 मालिकेतील या हँडसेटमध्ये दिलेला डिस्प्ले 400 nits चा पीक ब्राइटनेस देतो. Redmi A2 आणि Redmi A2+ स्मार्टफोन Android 13 (Go Edition) सह येतात. कॅमेऱ्याचं म्हणाल तर Redmi A2 सिरीजच्या या फोन्समध्ये बॅक पॅनलवर ८ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G36 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्सच्या बॅटरीचं म्हणाल तर 5000mAh ची तगडी बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

Redmi A2+Redmi Phonesmartphone budget smartphonesबजेट स्मार्टफोन्सरेडमी ए२+
Comments (0)
Add Comment