Redmi Watch 3 Lite : मोठ्या डिस्प्लेसह १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड, रेडमीची लेटेस्ट वॉच लाँच

नवी दिल्ली :Latest Smartwatch by Redmi : स्मार्टफोन ब्रँड्स म्हणून प्रसिद्ध रेडमीने आता स्मार्टवॉचेस बनवण्यासही सुरुवात केली असून त्यांनी लेटेस्ट Redmi Watch 3 Lite ही स्मार्टवॉच लाँच केली आहे. एप्रिल २०२३ मध्ये, Redmi Watch 3 Lite ला IMDA कडून सर्टिफिकेशन मिळाले होते त्यानंतर मार्चमध्ये वॉच SIRIM साइटवर सूचीबद्ध केली होते. ज्यानंतर आता वॉच लाँच झाली आहे. Redmi Watch 3 Lite (Watch 3 Youth Edition) मध्ये विशेष गोष्ट म्हणजे १.८३ इंचाचा तगडा AMOLED डिस्प्ले आहे, जो Redmi Watch 3 पेक्षा थोडा मोठा आहे. तसंच १०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड आहेत.

Redmi Watch 3 Lite चे स्पेसिफिकेशन्स
ब्लूटूथ कॉलिंग, 24/7 ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग आणि १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. याशिवाय महिलांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यासंबधित अनेक फंक्शन्सही यामध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय या नवीन वॉच 3 लाइटमध्ये २०० हून अधिक कस्टमाइज्ड वॉच फेस देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन, स्पीकर, NFC कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथ 5.3 सपोर्ट देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, Redmi Watch 3 Lite स्मार्टवॉच 5ATM वॉटरप्रूफ, WeChat आणि Alipay ऑफलाइन पेमेंटला सपोर्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की सामान्य वापरासह, या घड्याळाची बॅटरी ही १२ दिवसांपर्यंत मिळेल. परंतु जास्त वापरासह, हे घड्याळ पूर्ण चार्ज केल्यानंतर ८ दिवस चालेल.

किंमतीबाबत नेमकी माहिती अजूनही गुलदस्त्यात
Redmi Watch 3 Lite सध्या चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. मात्र या घड्याळाच्या किंमतीबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही. जागतिक बाजारपेठेत वॉच ३ लाइट लॉन्च करण्यासंबंधितही माहिती अजून समोर आलेली नाही. रेडमी वॉच 3 लाइट स्मार्टवॉच स्पेस ब्लॅक आणि ट्वायलाइट ग्रे कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वॉचची अंदाचे किंमत भारतीय रुपयांमध्ये ५ ते ६ हजार दरम्यान असेल अशी माहिती समोर येत आहे.

वाचाः Gmail वर मोठ्या फाइल्स पाठवण्यापासून ते मेल म्यूट करण्यापर्यंत, ‘हे’ ५ फीचर्स आहेत खूपच कामाचे

Source link

latest smartwatchRedmiredmi watchredmi watch 3 litesmartwatchरेडमी वॉच ३ लाईटस्मार्टवॉच
Comments (0)
Add Comment