Ahmednagar Unlock: ‘या’ जिल्ह्यातही निर्बंध होणार शिथील!; मुख्यमंत्र्यांना चिंता वाटत होती पण…

हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यातही निर्बंध होणार शिथील.
  • जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला नवा आदेश.
  • दैनंदिन रुग्णवाढ मोठी असूनही मिळणार दिलासा.

नगर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. त्यामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या सवलती मिळतात की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश जारी झाला. त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांत लागू करण्यात आलेल्या सर्व सवलती १५ ऑगस्टपासून अहमदनगर जिल्ह्यातही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, रुग्ण वाढून ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यास केव्हाही पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. ( Ahmednagar Unlock Order Updates )

वाचा: आमदार नियुक्तीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्यपाल कोश्यारींना धक्का

अहमदनगरसह काही जिल्ह्यांत कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत होती. हे जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांत सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर निकष बदलून ऑक्सिजनची उपलब्धता हा निकष गृहित धरण्यात आला. त्यानुसार राज्यभरासाठी सवलती जाहीर करण्यात आल्या. नगर जिल्ह्यात १७ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यातील काहींची उभारणी सुरू आहे. त्यातून ८४ टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या सवलती नगरलाही लागू करण्यात आल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हा आदेश काढला.

वाचा:मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली!; मित्रपक्षाच्या नेत्यानेच साधला निशाणा

दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्येत होणारी वाढ कायम आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली. गेल्या २४ तासांत ११५५ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा सहा हजारांवर गेली आहे. सर्वाधिक १६२ रुग्ण संगमनेर तालुक्यात नोंदवले गेले. त्या खालोखाल १३७ रुग्ण पारनेर तालुक्यात तर ११२ रुग्ण शेवगाव तालुक्यात आढळले आहेत. नगर शहरात ३५ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या हजारावर गेली होती, नंतर ती कमी झाली. त्यानंतर आता पुन्हा ती वाढली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली होती. राज्यात पंधरा ऑगस्टपासून लागू होणाऱ्या सवलती जिल्ह्यात लागू होणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती, मात्र सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना या सवलती लागू करण्याचा आदेश काढला.

जिल्ह्यात लसीकरणाचे वेग कमी आहे. सुमारे २० ते २२ टक्केपर्यंत नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. निर्बंध शिथील करताना दुकानांमध्ये दुकानदार व कर्मचारी तसेच हॉटेल-मॉलमध्ये कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनाही लसचे दोन डोस घेऊन १४ दिवस झालेले असावेत असे बंधन घालण्यात आले आहे. अर्थात याची तपासणी कोण करणार, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

वाचा:…म्हणून कॉकटेल लस देणं चुकीचं; पूनावाला यांनी करून दिली धोक्याची जाणीव

Source link

ahmednagar covid restrictions newsahmednagar unlock orderahmednagar unlock order updatescoronavirus in ahmednagarCoronavirus in Ahmednagar latest updateअहमदनगरउद्धव ठाकरेकरोनाकोविडराजेंद्र भोसले
Comments (0)
Add Comment