व्हॉट्सॲपच्या विविध अपडेट्स संबधित माहिती देणाऱ्या WABetainfo ने या नव्याने येणाऱ्या फीचरची माहिती दिली आहे. हे फीचर आता WhatsApp for iOS 23.6.0.74 बीटा ॲपमध्ये दिसून आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फीचरनंतरही एका ठराविक वेळेपर्यंतच युजरला सेंड केलेल्या मेसेजमध्ये एडिट करण्याचा ऑप्शन दिला आहे. पण ठराविक वेळेनंतर हा मेसेज ए़डिटही करता येणार नाही.
वाचा : दमदार बॅटरीचे ३ नवे स्मार्टफोन बाजारात, Infinix Note 30 सिरीजची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
CEO मार्क झुकरबर्गची माहिती
व्हॉट्सॲप हे मेटा कंपनीच्या मालकिचं ॲप असून मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. त्या फोटोवर व्हॉट्सॲपमध्ये सेंड झालेल्या एका मेसेजमध्ये एडिटींग होत असल्याचं दिसत आहे. तर याच्या कॅप्शनमध्ये मार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणाही मेसेज सेंड झाल्यावर १५ मिनिटांपर्यत एडिट केला जाऊ शकतो असंही सांगितलं आहे.
मेसेज एडिट करण्यासाठी काय कराल?
- आम्ही वर सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेसेज फक्त १५ मिनिटापर्यंतच एडिट करता येणार असल्याने त्याची काळजी घ्यावी.
- तर व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट अपडेटनंतर कोणताही सेंट झालेला मेसेज एडिटचा ऑप्शन येणार आहे.
- यासाठी फक्त सेंट झालेल्या चुकीच्या मेसेजवर टॅप करुन होल्ड करावं लागेल, ज्यानंतर अनेक ऑप्शन दिसतील.
- मग Edit Message चा ऑप्शन दिसेल. Edit Message वर टॅप केल्यावर त्यात हवा तो बदल करु शकाल.
- त्यानंतर पुन्हा सेंडवर टॅप करताच ओरिजनल मेसेजच्या जागी एडिटेड मेसेज सेंड होईल.
वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये