SmartPhone Features : फोनमध्ये फास्ट चार्जिंग की मोठी बॅटरी? कोणतं फीचर अधिक फायदेशीर?

नवी दिल्ली : Smartphone Features : सध्या बाजारात फास्ट चार्जिंगचे स्मार्टफोन आले आहेत. ज्यामुळे अगदी काही मिनिटांत बॅटरी चार्ज होते. Xiaomi, OnePlus, Realme सारख्या कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्ये तब्बल 150W पर्यंत फास्ट चार्जिंग देत आहेत. या कंपन्यांचा दावा आहे की त्यांचे फोन अगदी १० मिनिटांत फोन ६० ते ७० टक्के चार्ज होऊ शकतो. तर १५ ते २० मिनिटांत फोन पूर्ण चार्ज होऊ शकतो. पण दुसरीकडे सॅमसंगकडून पूर्वीप्रमाणेच २५ ते ४५W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देत आहे. पण त्यांच्या बॅटरी तशी mAh च्या दृष्टीने तगडी असते, तर आता मोठी बॅटरी कि फास्ट चार्जिंग काय फायद्याचं? याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

जलद चार्जिंग की मोठी बॅटरी?
जर तुम्ही फोन चार्ज करायला विसरलात किंवा फोन चार्जिंगसाठी कमी वीज असलेल्या भागात राहत असाल, तर मोठ्या बॅटरी असलेले फोन तुमच्यासाठी योग्य असतील. वास्तविक, मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन जास्ट बॅटरी लाईफ देतो. याशिवाय जर तुमच्या फोनचा वापर जास्त असेल आणि तुम्हाला फोन चार्जिंगमध्ये वेळ घालवायचा नसेल, तर तुम्ही फास्ट चार्जिंग फोन विकत घ्यावा. वास्तविक जलद चार्जिंग आणि मोठी बॅटरी हे दोन्ही चांगले ऑप्शन्स असून ग्राहक आपल्या आवडीप्रमाणे निवड करु शकतात.

फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी खराब होते का?
फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यासाठी, फोन त्यानुसार बनवला जातो. अशा स्थितीत फास्ट चार्जरने फोनची बॅटरी लवकर खराब होत नाही. फोनची बॅटरी सायकल निश्चित असते. पण फास्ट चार्जिंगला सपोर्ट न करणारा फोन फास्ट चार्जरने चार्ज करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अशा परिस्थितीत फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

वाचाः दमदार बॅटरीचे ३ नवे स्मार्टफोन बाजारात, Infinix Note 30 सिरीजची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

जलद चार्जिंगचे फायदे
फास्ट चार्जिंगमुळे फोनची बॅटरी लवकर चार्ज होते. ज्यामुळे एकदा आपली बॅटरी संपली की काही वेळातच पुन्हा चार्ज करुन आपण बॅटरी पुन्हा वापरण्यासाठी रेडी करू शकतो. स्मार्टफोन कंपन्या फास्ट चार्जिंगसह छोटी बॅटरी देऊन फोनला हलका बनवण्याचा आजकाल प्रयत्न करत आहेत.

वाचाः AI आता पुढील भविष्य, गुगल आणि अमेझॉनसाठी घोक्याची घंटाः बिल गेट्स

Source link

bigger batteryfast chargingsmartphoneSmartphone careSmartphone featuresफास्ट चार्जिंगबॅटरीस्मार्टफोनस्मार्टफोन फीचर
Comments (0)
Add Comment