या शुभ योगात निर्जला एकादशी व्रत; जाणून घेऊया तिथी, मुहूर्त आणि महत्व

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी ३१ मे रोजी आहे. वर्षातील सर्व २४ एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्त्वाची आहे. हे व्रत अन्नपाणी न घेता पाळले जाते, म्हणून या व्रताला निर्जला एकादशी म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, भीम म्हणजेच भीमसेन, ५ पांडवांपैकी एक, यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त एकच निर्जला एकादशी व्रत केली होती, म्हणून तिला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात.निर्जला एकादशीच्या संदर्भात विष्णु पुराणात सांगितले आहे की, जर तुम्ही वर्षभर एकच एकादशीचे व्रत करू शकत नसाल, तर निर्जला एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला सर्व एकादशींच्या उपवासाचे समान फळ मिळते. जो श्रद्धेने या पवित्र एकादशीचे पालन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. निर्जला एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मटकं, फळे, पंखा, सत्तू, कपडे दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते.

निर्जला एकादशी मुहूर्त
निर्जला एकादशी मंगळवार, ३० मे रोजी दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बुधवार, ३१ मे रोजी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीच्या मान्यतेनुसार ३१ मे रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. १ जून रोजी उपवासाची वेळ पहाटे ५.२४ ते ८.१० पर्यंत करता येईल. उपवास सोडतांना, दान केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतरच अन्न आणि पाणी घ्या.

निर्जला एकादशी शुभ योग
यावेळी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग यांसारख्या विशेष योगांमध्ये निर्जला एकादशी साजरी केली जाईल. ३१ मे रोजी पहाटे ५.२४ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील. त्यानंतर रवि योगही पहाटे ५:२४ पासून आहे, जो सकाळी ६ वाजेपर्यंत राहील.

यामुळे भीमसेन एकादशी म्हणतात
पौराणिक कथेत सांगितले आहे की, भीमाला जास्त भूक लागायची, त्यामुळे त्याने उपवास केला नाही. पण मोक्ष मिळवायचा होता, त्यामुळे त्यांना व्यासजींनी पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी निर्जला एकादशीचे महत्व भीमाला सांगितले आणि निर्जला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. म्हणूनच त्यांनी आयुष्यभर फक्त निर्जला एकादशी व्रत पाळले आणि शेवटी मोक्ष मिळाला.

Source link

nirjala ekadashi 2023nirjala ekadashi 2023 datenirjala ekadashi 2023 shubh muhurtanirjala ekadashi 2023 shubh yognirjala ekadashi importance in marathiएकादशी महत्वएकादशी २०२३निर्जला एकादशी २०२३
Comments (0)
Add Comment