कसे उडवले ५ कोटी?
एका वृत्तसंस्थेच्या माहितनुसार, हे प्रकरण चीनमधील आहे. जिथे अगदी लेटेस्ट अशा डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून, घोटाळेबाजाने मित्र असल्याचं दाखवत समोरच्या व्यक्तीला लुटलं आहे. फेस स्वॅपिंग तंत्रज्ञानाने चेहरा बदलल्यावर व्हिडिओ कॉलवर पीडित व्यक्तीचा मित्र असल्याचा दावा करतो आणि समोरच्याला विश्वास बसवतो. यानंतर तो मित्राला सांगतो की त्याला एका महत्त्वाच्या कामासाठी काही पैसे कमी पडत आहेत. त्यानंतर, घोटाळेबाजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित व्यक्तीनेही त्याच्या खात्यात तब्बल ५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान याआधीही अशी प्रकरणं समोर आली आहेत. मागील महिन्यात, काही घोटाळेबाजांनी AI च्या मदतीने तरुणाच्या आवाजाची नक्कल करून त्याच्या आईच्या खात्यातून पैसे उकळले होते.
AI च्या वापरावर बंदी घालण्याची मागणी
अशा प्रकरणांनंतर पुन्हा एकदा AI च्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच अनेक तज्ञांनी एआयच्या वापराबद्दल चेतावणी दिली आहे. AI चा वापर थांबवण्याबद्दल अनेक तज्ञांनी सांगितले आहे. यासोबतच भारत सरकार AI चे नियमन करण्याबाबतही बोलत आहे. कारण एआयच्या वापरावर बंदी घातली नाही तर हे भविष्यात फारच महाग पडू शकतं.
SmartPhone Features : फोनमध्ये फास्ट चार्जिंग की मोठी बॅटरी? कोणतं फीचर अधिक फायदेशीर?