Watch Video : अवकाशातील हालचाली टेलिस्कोपने पाहत होते सायटिंस्ट, अचानक ताऱ्याचा स्फोट, घटना कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली : Supernova in Pinwheel : अवकाशात असंख्य तारे असतात. आपण ते पाहतही असतो पण या ताऱ्यांचा सखोल अभ्यास अंतराळातील शास्त्रज्ञ करत असतात. दरम्यान या ताऱ्यांचा अभ्यास करताना कितीतरी गोष्टींचा उलगडा त्यांना होत असतो. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत शोध लावल्याप्रमाणे एखादा तारा हा तुटत असताना त्याचा एक भयंकर स्फोट होतो. तर याच ताऱ्यांमधील स्फोटाच्या घटनेला Supernova म्हणतात. हीच घटना एका खगोल अॅस्ट्रोफोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात पृथ्वीवरून टिपली गेली आहे.अँड्र्यू मॅकार्थी हे एक प्रसिद्ध खगोल छायाचित्रकार आहेत आणि त्यांनी अनेक असे फोटो, व्हिडीओ काढले आहेत, ज्यांनी जगाला आश्चर्यचकित केलं आहे. अँड्र्यू सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात आणि खगोलीय घडामोडींची महत्त्वाची माहिती देतात. दरम्यान आता अँड्र्यू मॅकार्थीने एक सुपरनोव्हा इव्हेंट कॅप्चर केला आहे. ते टेलिस्कोपने पिनव्हील आकाशगंगेची तपासणी करत असतान एका ताऱ्याचा स्फोट झाला जो त्यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

वाचाः Window AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण

पिनव्हील गॅलेक्सीला M10 असेही म्हणतात. ती आपल्या आकाशगंगेपेक्षा सुमारे ७० टक्के मोठी आहे आणि पृथ्वीपासून २१ दशलक्ष प्रकाश-वर्षे दूर आहे. वर्षी मार्चमध्ये सूर्यप्रकाशात एक घटना पाहायला मिळाली. एक सौर चक्रीवादळ आलं होतं. त्याची उंची पृथ्वीच्या उंचीपेक्षा सुमारे १० पट जास्त होती. अँड्र्यू मॅकार्थीने आपल्या ट्विटमध्ये याची पुष्टी केली होती. दरम्यान आता पिनव्हील गॅलेक्सीतील सुपरनोव्हा घटनाही अँड्र्यू मॅकार्थीने त्याच्या ट्वीटरवर पोस्ट केली आहे.

पाहा VIDEO

वाचा : Microsoft Build 2023 : मायक्रोसॉफ्टच्या ८ घोषणा आणि टेक्नोलॉजीत ‘हे’ बदल होणार, पाहा डिटेल्स

Source link

andrew mccarthygalaxypinwheel galaxyspacesupernovaगॅलक्सीपिनविल गॅलेक्सीस्पेस
Comments (0)
Add Comment