HSC Result: कुठे शोधत राहू नका! बारावीचा निकाल मोबाईलमध्ये SMS वर ‘असा’ पाहा

HSC Result: बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी २ नंतर पाहता येणार आहेत.

एकाचवेळी अनेक विद्यार्थी निकाल पाहत असल्याने बोर्डाची वेबसाइट क्रॅश होण्याची शक्यता असते. असे झाले तरी तुम्ही काळजी करु नका. कारण बोर्डाकडून निकाल पाहण्यासाठी विविध पर्याय खुले करण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातूनदेखील तुम्हाला निकाल पाहू शकता.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येईल. यासोबतच एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे इंटरनेट नसले तरीही निकाल सर्वात आधी तुमच्या थेट मोबाइलमध्ये येऊ शकणार आहे.

HSC Result On SMS: पुढील स्टेप्स करा फॉलो

तुमच्या मोबाईलमधून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे.

याच्या सुरुवातीला कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करा.

त्यापुढे रोल नंबर टाइप करा.

हा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठव.

यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Source link

12th Result 2023baravi nikalDownload MSBSHSE Class 12 Result 2023how to check maharashtra ssc 12th result 2023HSC Result 2023HSC Result on mobileHSC Result on SMSmaharashtra board Hsc result 2023maharashtra ssc class 12th result 2023Maharashtra SSC Results 2023mahresultMSBSHSE Class 10 Result 2023MSBSHSE Class 12 Result 2023 download linkMSBSHSE Resultबारावी निकालबारावीचा निकालमहाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल
Comments (0)
Add Comment