दमदार कॅमेरा असणाऱ्या फोन्सवर दमदार डिस्काउंट, Vivo Y100 आणि Vivo Y100A ची किंमत झाली कमी

नवी दिल्ली : Vivo Y100, Vivo Y100A Price Cut : मोबाईल ब्रँड्समध्ये एक आघाडीची कंपनी असणारी विवो नवनवीन प्रोडक्ट्स भारतात आणत असते. आधी फक्त कॅमेऱ्यावर लक्ष देणारी विवो आता फ्लॅगशिप फोन दमदार प्रोसेसरसह लाँच करत आहे. काही काळापूर्वीच विवोने Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोन्स अनुक्रमे फेब्रुवारी २०२३ आणि एप्रिल २०२३ मध्ये लाँच केले. दरम्यान दमदार कॅमेरा आणि प्रिमीयम लूक असणाऱ्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीत कंपनीने नुकतीच कपात केली आहे. Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्सही देण्यात येत आहेत. तर या दोन्ही Vivo स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्सबद्दल जाणून घेऊ…Vivo Y100, Y100A वर खास ऑफर्स
Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोन्सचे बेस व्हेरिएंट भारतात २४,९९९ रुपयांना लाँच केले गेले. आता कंपनीने या दोन्ही फोन्सवर १००० रुपयांची सूट जाहीर केली आहे. ज्यामुळे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट आता २३,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तसंच Vivo Y100A चा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २६,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. पण आता Vivo ने Y100A च्या या २५६ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये इतकी कमी केली आहे. याशिवाय एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक, फेडरल बँक, येस बँक आणि एयू बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय व्यवहारांद्वारे फोनच्या खरेदीवर आणखी २,००० रुपयांची सवलत मिळेल, असंही कंपनीने सांगतिलं आहे.

Vivo Y100, Vivo Y100A चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोन्समध्ये ६.३८ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे जो फुलएचडी+ रिझॉल्यूशन ऑफर करतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. स्क्रीनचा कमाल ब्राइटनेस 1300nits आहे. Vivo Y100 मध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 6nm प्रक्रियेवर आधारित आहे. ग्राफिक्ससाठी हँडसेटमध्ये Mali G68 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. तर Vivo Y100A स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे जो 6nm प्रक्रियेवर आधारित आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Vivo ने स्मार्टफोनमध्ये एक्सटेंडेड रॅम फीचर दिले आहे ज्याद्वारे रॅम ८ जीबी पर्यंत वाढवता येईल. या दोन्ही फोनमध्ये Android 13 आधारित Funtouch OS 13 देण्यात आला आहे.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यावेळी ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये २ मेगापिक्सल मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर देण्यात आले आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे ज्यामध्ये अपर्चर F/2.0 आहे. Vivo Y100 आणि Y100 ला पॉवर देण्यासाठी, 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

smartphone discountvivovivo phone discountvivo y100vivo y100 price cutvivo y100aविवा प्राईस कटविवोविवो वाय१००स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment