एअरटेलच्या पोस्टपेड प्लान्सबद्दल म्हटलं तर ते ३९९ रुपयांपासून सुरु होतात. पण या प्लानमध्ये तुम्हाला कोणतही OTT बेनिफिट मिळत नाही. दरम्यान तुम्हाला रिचार्जच्याा फायद्यांसह OTT सेवांचाही लाभ घ्यायचा असेल तर ४९९ चा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये बरेच एक्ट्राचे फायदे कंपनी तुम्हाला देते. ज्यात डेटा रोलओव्हरसारख्या सुविधाही आहेत. तर या ४९९ रुपयांच्या रिचार्जबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
४९९ रुपयांचा एअरटेलचा पोस्टपेड प्लान
या प्लानमध्ये दरमहा ७५ जीबी डेटा आणि दररोजसाठी १०० एसएमएस मिळणार आहेत. तसंच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा कंपनी देणार आहे. तसंच खास गोष्ट म्हणजे कंपनी Amazon Prime चं सब्सक्रिप्शन देखील देणार आहे. सहा महिन्यांसाठी हे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यासोबतच Disney+ Hotstar चं मोबाईल सब्सक्रिप्शन वर्षभरासाठी या प्लानमध्ये मिळणार आहे. या प्लानमध्ये हँडसेट प्रोटेक्शन, Xstream Mobile Pack आणि Wynk Music चं प्रिमीयम अॅक्सेस मिळणार आहे.विशेष म्हणजे हा एक फॅमिली प्लान असून यात अॅडऑन कनेक्शन्सही घेता येणार आहेत. प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाठी २९९ रुपये भरावे लागणार असून त्यानंतर त्या कनेक्शनला ३० जीबी डेटा, तसंच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोजसाठी १०० एसएमएस मिळणार आहेत.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा