HSC Result 2023: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येईल. तत्पूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर आकडेवारी आणि तपशील मांडण्यात आला. त्यानुसार बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळांमध्ये नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकणातून सर्वाधिक म्हणजे ९६.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर मुंबई विभागातून सर्वाधिक कमी म्हणजे ८८.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका पाहता येणार आहे. काही विद्यार्थी नापास झाल्याने किंवा कमी गुण मिळाल्याने नाराज होतात. पण या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीची संधी बोर्डाकडून देण्यात आली आहे.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क विद्यार्थ्यांना डेबिट कार्ड, यूपीआय/ नेट बॅंकींगद्वारे भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ५ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रू. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती ई-मेलद्वारे/ वेबसाइटवरून/ हस्तपोहोच किंवा रजिस्टर पोस्टाने पाठविली जातील. त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे शुक्रवार, १४ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीनेकडे जमा करावे लागेल.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा