अबब! LG ने लाँच केला १ करोडचा टीव्ही, ९७ इंच स्क्रीन असणारा हा स्मार्टटीव्ही एकदा पाहाच!

नवी दिल्ली : LG कंपनीने भारतीय बाजारपेठेत OLED टीव्हीची नवीन सिरीज श्रेणी लाँच केली असून ही सिरीज खासकरुन गेमर्ससाठी एक भारी अशी फ्लेक्सिबल सिरीज आहे. विशेष म्हणजे एलजी कंपनीने जगातील पहिला तब्बल ९७ इंचाचा OLED टीव्ही लाँच केला आहे. याशिवाय कंपनीने इतरही बरेच मॉडेल लाँच केले आहेत. यामध्ये 8K OLED Z3 मालिका, OLED evo Gallery Edition G3 मालिका, OLED evo C3 मालिका, OLED B3 आणि A3 मालिका या टीव्हींचा समावेश आहे. कंपनीच्या या नवीन फ्लेक्सिबल OLED गेमिंग टीव्हीची किंमत २,४९,९९० रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, कंपनीच्या टॉप मॉडेल ९७ इंचाच्या टीव्हीची किंमत भारतात तब्बल १ कोटींहून अधिक असेल.LG Flexible OLED TV मध्ये कर्व्ह स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन १२ वेगवेगळ्या अॅडजस्टेबल स्तरांसह येते. या टीव्हीची उंची देखील कमी जास्त केली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की टीव्ही स्क्रीन अँटी रिफ्लेक्शन कोटिंगसह येते, ज्यामुळे ही अधिक प्रोटेक्टीव्ह असेल. यासोबतच डॉल्बी व्हिजनचा सपोर्टही देण्यात आला आहे. यात 40W स्पीकर्सचा सपोर्ट आहे. नवीन LG OLED टीव्ही हे गेम ऑप्टिमायझर या फीचरसह येतात. यामध्ये गेमर्ससाठी विशिष्ट सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या टीव्हींचा रिस्पॉन्स टाईम हा केवळ ०.१ मिलीसेकंद इतका फास्ट आहे. अगदी भारी आणि स्मूद गेमिंग अनुभव यात मिळत आहे. गेम ऑप्टिमायझर विभागात G-SYNC, FreeSync प्रीमियम, रिफ्रेश रेट हे फीचर्सही आहेत.

एखाद्या पेटिंगसारखा दिसेल टीव्ही

याशिवाय इतर फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर LG ने C3 OLED evo TV सादर केला आहे. जो खूपच स्लिम आहे. हे टीव्ही वन वॉल डिझाइनसह सादर करण्यात आले आहे. भिंतीवर हे टीव्ही लावल्यानंतर, टीव्ही आणि भिंतीमध्ये काहीच अंतर राहणार नाही. ज्यामुळे आणखी भारी लूक येणार आहे. टीव्ही अगदी एखाद्या कॅनव्हास पेंटिंगसारखे दिसतील. LG G3 OLED Evo TV मालिका ५५ इंच, ६५ इंच आणि ७७ इंच आकारात येणार आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

lg flexible gaming tvlg smarttvlg tvsmart tv in indiaएलजी फ्लेक्सीबल गेमिंग टीव्हीएलजी स्मार्टटीव्हीस्मार्ट टीव्ही
Comments (0)
Add Comment