हायलाइट्स:
- पुन्हा कधीच दिसणार नाही हा हसरा चेहरा
- अंगावर माकड बसल्याने चिमुकला खूप घाबरला
- पुढे जे घडलं ते वाचून पालकांना धक्का बसेल
नांदेड : एखाद्याला कसा मृत्यू येईल याचा काही भरोसा नाही. आपल्या आजूबाजूलाही अशाच भयंकर मृत्यूच्या घटना समोर येत असतात. नांदेडमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल. खरंतर, ही बातमी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, यामध्ये आपल्या मुलांची भीती घालवणं किती महत्त्वाचं आहे. याची तुम्हाला कल्पना येईल.
नांदेडमध्ये अंगावर माकड येऊन बसल्याच्या दहशतीने एका चिमुकल्याचा बळी गेला आहे. मुदखेड तालुक्यातील बारड गावातील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दहा वर्षीय वीर नागेश संगेवार हा घरासमोर खेळत होता. त्याचवेळी एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. अचानक अंगावर माकड येऊन बसल्याने वीर खूप घाबरला होता. त्याने याची भयंकर धास्ती घेतली होती. त्याच्या भीतीनेच त्याला ताप भरला. यामुळे त्याला तातडीने नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
या दरम्यान, त्याच्या विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र, त्या सर्व नॉर्मल आल्या. डॉक्टरांनी वीरशी बोलणं केलं असता त्याला माकडाची खूप भीती होती हे लक्षात आलं. त्याला सतत माकडं पुन्हा येईल असं वाटत होतं. यामुळेच त्याला तापही आल्याचं समोर आलं.
माकडांबद्दलची त्याच्या मनातील दहशत कमी झाली नव्हती. यामुळेच त्याला १३ ऑगस्ट रोजी त्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांनाही मोठा धक्का बसला आहे. तर पालकांमध्येही यामुळे चिंतेचं वातावरण आहे.