उत्तरपत्रिकेत उत्तरांशिवाय कोणताही मजकूर आक्षेपार्ह ठरतो. या प्रकरणात पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी झाली. यात सर्वांत गंभीर बाब म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील अक्षरबदलाचा प्रकार समोर आला. बहुतांशी भौतिकशास्त्र विषयाशी संबंधित हे गैरप्रकार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी हा पेपर झाला होता. सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांनी हे हस्ताक्षर नसल्याचे म्हटले.
अर्धवट उत्तरे पूर्ण लिहण्यात आली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. शिक्षण मंडळात आलेल्या पालकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची सुनावणीनंतर मंडळाने केंद्रप्रमुखांना नोटीस पाठवून, या प्रकरणात खुलासे मागविले आहेत. मंडळाच्या नोटीसनंतर शिक्षकांमध्ये खळबळ उडाली.
हस्ताक्षर आमचं नसल्याचे मुलांनी लेखी लिहून दिले. चौकशी अंती प्रथमदर्शनी मूल दोषी नाहीत,त्यांच्या स्व अक्षरातील मूळ लिखाणानुसार निकाल जाहीर केल्याचे बोर्डाने सांगितले.
शिक्षण मंडळाकडून सोयगाव तालुक्यातील फर्दापूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
३७२ मुलांचा निकाल जाहीर
या विद्यार्थ्यांची आम्ही प्राथमिक चौकशी केली. पेपरवरील हस्ताक्षर आपले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. चौकशी अधिकाऱ्याचे अभिप्राय आणि सक्षम समितीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरानुसार त्यांना गुण देण्यात आले आहेत. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करत असल्याचे सांगण्यात आले.
आम्ही सर्व विद्यार्थ्यांची, केंद्र संचालकांची, कस्टोडियनची, परीक्षक आणि कॉलेजच्या प्राचार्यांची चौकशी केल्याचे औरंगाबाद विभागीय सचिव विजय जोशी यांनी सांगितले.