WhatsApp वर चॅटिंगची मजा आणखी वाढणार, फॅन्सी फॉन्ट्स वापरुन कसं कराल चॅटिंग?

नवी दिल्ली :WhatsApp Chat Feature : व्हॉट्सॲपचा वापर आजकाल इतका वाढला आहे की जर एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा एखादं महत्त्वाचं डॉक्यूमेंटही पाठवायचं असेल तर आपण मी व्हॉट्सॲप करतो असंच म्हणत असतो. त्यामुळे आजकाल मेसेज पाठवण्यापासून ते कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग तसंच महत्त्वाची कागदपत्रं पाठवण्यासारखी सर्वच कामं व्हॉट्सॲपवर होत असतात.

आता व्हॉट्सॲपची हीच चॅटिंग आणखी भारी आणि रंगतदार होणार आहे. तर आज आम्ही तुम्हाला एक अद्भुत ट्रिक सांगत आहोत ज्यामुळे चॅटिंगची मजा द्विगुणित होईल. व्हॉट्सॲपचा फाँट बदलता येणार आहे. पण अजूनतरी व्हॉट्सॲपने असे कोणतेही फीचर दिलेले नाही, त्यामुळे या कामात थर्ड पार्टी ॲप्स तुम्हाला मदत करतील. या ॲपचे नाव आहे स्टायलिश टेक्स्ट – फॉन्ट कीबोर्ड. तुम्ही हे ॲप कसे वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो…

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंगचा फाँट कसा बदलाला?

  • सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जावे लागेल. त्यानंतर Stylish Text – Fonts Keyboard टाइप करा आणि हे ॲप इन्स्टॉल करा.
  • डाउनलोड केल्यानंतर, ॲप उघडा आणि स्क्रीनच्या खालील उजव्या कोपर्यात दिलेल्या बाणावर टॅप करा.
  • त्यानंतर Agree बटण दिसल्यावर त्यावर टॅप करा.
  • नंतर तळाशी उजव्या कोपर्यात कीबोर्ड विभागात जा.
  • त्यानंतर Enable Keyboard वर टॅप करा. नंतर स्टायलिश मजकूर कीबोर्ड Enable करा. ज्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये जाऊन स्टायलिश फाँट वापरु शकता

How to Whatsapp Without Saving Number : Whatsapp पर बिना नंबर सेव किए ऐसे करें Message

अनोळखी कॉल होतील Mute
व्हॉट्सॲपमध्ये आणखी एक नवीन फीचर्स येणार असून समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपमध्ये अनोळखी नंबरवरुन आलेला फोन व्हॉट्सॲपवर आपोआप सायलेंट होणार आहे. हे फीचर कंपनी घेऊन येणार आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo च्या रिपोर्टनुसार अॅन्ड्रॉईड 2.23.10.7 अपडेटसोबत या फीचरला कंपनी आणणार आहे. याच्या मदतीने अनोळखी नंबरवरुन येणारा फोन सायलेंट करु शकतो. अनोळखी नंबरला सायलेंट करण्यासाठीची सेटिंग व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनमध्ये असेल.ती सेटिंग ऑन करताच हे फीचर वापरता येईल. फोन सायलेंट झाल्यावर नंतर कळण्यासाठी हा नंबर नोटिफिकेशन आणि कॉल लॉगमध्ये नक्कीच दिसेल.

वाचा : Lock WhatsApp Chat: आता व्हॉट्सॲपचे प्रायव्हेट चॅट होणार एकदम लॉक, फोनचा पासवर्ड मिळाला तरी चॅट राहणार सेफ

Source link

locked chatWhatsAppwhatsapp chatWhatsApp featurewhatsapp newsव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप चॅटव्हॉट्सॲप फीचर
Comments (0)
Add Comment