तरJio ने त्याच्या फायबर वापरकर्त्यांसाठी ११९७+GST या किंमतीत हा प्लान आणला आहे. ज्याची वैधता ९० दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. या तिमाही प्लानमध्ये वापरकर्त्यांना 30Mbps चा स्पीड मिळतो. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, या प्लानमध्ये ग्राहकांना दर महिन्याला तब्बल 3.3TB म्हणजे ३,३०० GB डेटा मिळतो. दरम्यान हा डेटा संपल्यावर स्पीड कमी होते पण इंटरनेट सुरूच राहते.
100Mbps चा प्लान ही उपलब्ध
Jio ग्राहकांना 100Mbps चा तीन महिने वैधतेचा प्लान देखील ऑफर करत आहे. २०९७ + GST इतके पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय वापरकर्त्यांसाठी 150Mbps योजना देखील उपलब्ध आहे ज्यासाठी त्यांना रुपये २९९७+ GST भरावा लागेल. या योजनेसह, कंपनी तीन महिन्यांसाठी 16 OTT अॅप्सची सुविधा देखील प्रदान करते.
कसा कराल रिचार्ज?
- वर नमूद केलेल्या योजनांचे रिचार्ज करण्यासाठी, तुम्ही Jio च्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर जा
- येथे फायबर कनेक्शन निवडा आणि रिचार्ज विभागात या
- नंतर इच्छित रिचार्ज प्लान निवडा आणि पेमेंट करून त्याची पुष्टी करा
वाचा : आता व्हॉट्सॲपचे प्रायव्हेट चॅट होणार एकदम लॉक, फोनचा पासवर्ड मिळाला तरी चॅट राहणार सेफ