आगामी फोन्स आणि टेक्नोलॉजी संबधित माहिती देणाऱ्या एका टिपस्टर पेजने एक फोटो शेअर केला होती. दरम्यान Moto Razr 2023 मालिकेची लाँचिंगची तारीख जून आहे. हा एक लूकमध्ये आणि फीचर्समध्येही प्रिमीयम फोन असून याची स्पर्धा ही भारतीय बाजारात आधीपासूनच असलेल्या गुगल पिक्सेल फोल्ड आणि सॅमसंगच्या फोल्ड फोनशी असणार आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Moto Razr 2023 चे संभाव्य फीचर्स
या Motorola Razr 40 Ultra चे काही फीचर्स लीक झाले आहेत. ज्यानुसार मोटोरोलाच्या या फोनमध्ये ३.५ इंच बाहेरची स्क्रीन असेल. Twin Blas फोन मध्ये असणार असून Razr 40 Ultra दोन प्रकारांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन LED फ्लॅशसह इन-हाउस ड्युअल रेअर कॅमेरा सेटअपसह येणार आहे .तसंच या फोनमध्ये सेल्फीसाठी पंच होलसह फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे. Moto Razr 40 Ultra ला AMOLED डिस्प्लेसह 1080P रिझोल्यूशन सपोर्ट मिळेल. प्रोसेसरचं म्हणाल तर Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट या फोनमध्ये दिला जाईल, जो 12GB RAM आणि 512GB स्टोरेजसह सपोर्टेड असणार आहे. दरम्यान या फोनची किंमत अजून स्पष्ट झाली नसली तरी ही ८० ते ९० हजारांच्या घरात असल्याची चर्चा आहे.
वाचा : आता WhatsApp वर चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, इन्स्टाग्रामसारखं खास फीचर लवकरच येणार