तर एलन मस्कची कंपनी न्यूरालिंक मानवाच्या मेंदूमध्ये एक कॉम्प्यूटर चिप बसवणार आहे, ज्याच्या मदतीने मानवी मेंदू नियंत्रित केला जाऊ शकतो आणि तो थेट कॉम्प्यूटरशी जोडला देखील जाऊ शकतो. मस्कच्या कंपनीला यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एफडीएने क्लिनिकल चाचण्यांसाठी मान्यता दिली आहे. म्हणजेच, ते आता मानवी मेंदूमध्ये चिप्स लावून न्यूरालिंक तंत्रज्ञानाची चाचणी करू शकतात, ते कसे कार्य करते आणि त्याद्वारे काय शक्य आहे, याचा शोध लावू शकतात. तर ही चिप बसवून अशा लोकांचीच क्लिनिकल चाचणीसाठी निवड केली जाईल, जे स्वतः या कामासाठी सहमत असतील. म्हणजेच, यासाठी, कंपनीकडून एक फॉर्म जारी केला जाईल, जो इच्छुक लोक भरून या चाचणीचा भाग बनू शकतात. अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही.
न्यूरालिंक चिपने अशक्यही होईल शक्य
जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर ही एक मायक्रो चिप असेल, म्हणजे एक छोटी एआय चिप अगदी सिम कार्डपेक्षाही छोटी. जी मानवाचा माईंड वाचेल आणि त्याच्या मदतीने दिव्यांगांवर उपचारासारखे अशक्य वाटणारे प्रयोगदी करता येऊ शकता. या चिपच्या मदतीने अनेक आजार वेळेवर ओळखून ते बरेही होऊ शकतात. ही न्यूरालिंक चिप कॉम्प्यूटरशी जोडली जाणार असून ती व्यक्ती न बोलताही कॉम्प्यूटर आणि मोबाइलवर काम करू शकणार आहे. म्हणजे चिप तुमचे मन वाचेल आणि सर्व क्रिया न बोलता होत राहतील. ज्यांना अर्धांगवायू, अंधत्व, स्मरणशक्ती कमी होणे आणि न्यूरो संबंधित आजार आहेत त्यांच्यासाठी न्यूरालिंक चिप विशेषतः फायदेशीर आहे. या तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती येत्या काळातच कळेल की, ही चिप सर्व काही कशी चालवते. पण सध्यातरी, मस्कच्या कंपनीला USFDA ची मान्यता मिळाली आहे, याचा अर्थ मानवी चाचणी लवकरच होईल आणि या चिपचं भविष्य स्पष्ट होईल.
वाचा : आता WhatsApp वर चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, इन्स्टाग्रामसारखं खास फीचर लवकरच येणार