पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त 1 कोटी 14 लाख रूपये किंमतीचे 41 हजार 986 मिलीग्रॅम एलएसडी जप्त

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 

पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. शहरातील रस्त्यावरुन आपल्याला फुडची डिलिव्हरी रात्री अपरात्री करण्यासाठी जाताना दिसतात. फुड डिलिव्हरी करत असल्याने त्यांच्याकडे कोणी संशयानेही पहात नाही. याचाच गैरफायदा घेऊन एका टोळक्याने अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत त्याचे पार्सल पोहचविण्यासाठी चक्क डनजो डिलिव्हरी अॅपचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, अटक आरोपींकडून आतापर्यंत तब्बल 1 कोटी 14 लाख रूपये किंमतीचे 41 हजार 986 मिलीग्रॅम एलएसडी जप्त करण्यात आले आहे.

रोहन दीपक गवई (वय २४, रा. डि पी रोड, कर्वे पुतळा, कोथरुड), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय ३६, रा. बाणेर, मुळ कोडोली, सातारा Satara), धिरज दिपक 1 लालवाणी (वय २४, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय २५, रा. सनसिटी रोड, – ओंकार रमेश पाटील (वय २५, रा. वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी रोहन गवई, धिरज लालवाणी आणि ओंकार रमेश पाटील यांच्या ताब्यातून 51 लाख 60 हजार रूपये किंमतीचे एलएसडी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, ओंकार रमेश पाटील याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने त्याच्या अॅक्टीव्हा गाडीच्या डिक्कीत काही माल लपवुन ठेवला असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याच्या गाडीच्या डिक्कीतील 62 लाख 70 हजाराचे एलएसडी जप्त केले आहे..

पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना कोथरुड व परिसरात जो ऑनलाईन डिलिव्हरी अॅपद्वारे एल एस डी या अंमली पदाथार्ची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रोहन गवई याला पकडून त्यांच्याकडून एल एस डी जप्त केले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे इतर साथीदारही असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्य चौघांना बाणेर, सिंहगड रोड, पिंपळे सौदागर, वाकड परिसरातून अटक केली.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गवई हा एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. गायकवाड हा अभियंता असून त्यांचे इ साथीदारही उच्च शिक्षित आहेत. पायचा नाद आणि शौक पुरविण्यासाठी पैसा मिळविण्यासाठी त्यांनी हा अंमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरु केला. धीरज, दीपक आणि ओंकार हे तिघे यातील मास्टर माईंड असून इतर पेडलर आहेत. व्हॉटस अॅपद्वारे संपर्क साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फुड अॅपद्वारे ऑर्डर बुक करत असत. त्यानंतर समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करुन देत असत. या पार्सलमध्ये काय आहे, हे डिलिव्हरी बॉयला माहिती नसायचे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, पोलिस अंमलदार विशाल शिंदे, पोलिस योगेश मोहिते, पोलिस मारूती पारधी, पोलिस सुजित वाडेकर, पोलिस मनोजकुमार साळुंके,पोलिस पांडुरंग पवार, पोलिस ज्ञानेश्वर घोरपडे, पोलिस प्रविण उत्तेकर, पोलिस विशाल दळवी, पोलिस संदिप शिर्के, पोलिस राहुल जोशी, पोलिस संदेश काकडे, पोलिस नितेश जाधव, पोलिस सचिन माळवे आणि महिला पोलिस अंमलदार रेहाना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Comments (0)
Add Comment