5 Died Due To Delta Plus: राज्यात डेल्टा प्लसमुळे ५ रुग्णांचा मृत्यू, आढळले एकूण ६६ रुग्ण

मुंबई: राज्यात आतापर्यंत एकूण डेल्टा प्लसचे ६६ रुग्ण आढळले असून यांपैकी एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ पुरुषांचा, तर २ महिलांचा समावेश आहे. या ५ पैकी दोन मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाले असून मुंबई, बीड आणि रायगडमध्ये प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. (Five patients have died due to Delta Plus in the state, while a total of 66 patients have been found in the state)

मृत्यू पावलेल्या या ५ जणांपैकी २ जणांनी कोविशिल्ड लशीचे डोस घेतलेले होते, तर इतर दोघांनी कोणताही डोस घेतलेला नव्हता. तर उर्वरित एकाने लस घेतली होती की नव्हती याबाबत माहिती उपलब्ध नाही.

‘नागरिकांनी घाबरून जाऊ नये’

विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे हा विषाणूच्या जीवनक्रमाचाच एक भाग आहे. या संदर्भात जनतेने भिती न बाळगता कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक विभागाने केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका आशाताईंचे ‘असे’ केले कौतुक, म्हणाले…

राज्यात एकूण ६६ डेल्टा प्लस रुग्ण

आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेने ठाणे जिल्ह्यात १ डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला असल्याचे म्हटले आहे. या बरोबर राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६६ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या ५० वर्षीय महिलेला २२ जुलै रोजी सौम्य स्वरुपाचा कोविड आजार झाला होता. मात्र त्यातून ही महिला पूर्णपणे बरी झालेली आहे.

क्लिक करा आणि वाचा- … नाहीतर ईडी लावणार; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज

डेल्टा प्लसचे कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

राज्याच्या आरोग्य विभागाने डेल्टा प्लस व्हेरिएंटचा तपशील प्रसिद्ध केला असून त्यानुसार सर्वात जास्त डेल्टा प्लसचे रुग्ण जळगावात आढळले आहेत. जळगावात रुग्णांची संख्या १३ इतकी असून त्या खालोखाल रत्नागिरीत १२, मुंबईत ११, ठाण्यात ६, पुण्यात ६, पालघर आणि रायगडमध्ये प्रत्येकी ३, नांदेड आणि गोंदियात प्रत्येकी २, चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

क्लिक करा आणि वाचा- पंकजा मुंडेंची नाराजी झाली दूर?; कराड यांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला पंकजाच दाखवणार हिरवा झेंडा

Source link

5 patients died due to delta plus66 delta plus patientsडेल्टा प्लस व्हेरिएंटडेल्टा प्लसचे ६६ रुग्णडेल्टा प्लसमुळे ५ रुग्णांचा मृत्यू
Comments (0)
Add Comment