जिओचा ३९९ रुपयांचा फॅमिली प्लॅन
हा प्लॅन ३९९ रुपयांचा आहे. यामध्ये घरातील तीन सदस्य जोडता येतील. प्रत्येक सदस्यानुसार अधिक ९९ रुपये वेगळे भरावे लागतील. या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा दिला जाईल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० मेसेजची ऑफर दिली जात आहे. ही योजना ४ सदस्यांसह सुमारे ६९४ रुपयांची आहे.
जिओचा ६९९ रुपयांचा फॅमिली प्लॅन
या प्लानमध्ये १०० GB डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगही देण्यात येत आहे. यामध्ये घरातील ४ सदस्यही जोडता येतील. यासोबतच या प्लानमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे. या प्लानमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून स्वतंत्रपणे ९९ रुपये आकारले जातील. एकूण ४ सदस्यांसह हा प्लान सुमारे ११९६ रुपयांचा असेल.
टीप – जिओचे हे दोन्ही प्लान पहिल्या महिन्यासाठी मोफत असतील. हा पोस्टपेड प्लान असून या प्रकरणात, त्यांचे बिल महिन्याच्या शेवटी येईल. यासोबतच या योजनेत करही भरावा लागणार आहे. याशिवाय पहिल्या महिन्यात ५०० रुपयांची सुरक्षा ठेव भरावी लागेल.
वाचा : Budget Smartphones : भारी लूक आणि दमदार फीचर्स, १५००० पेक्षा कमी किंमतीत ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन्स