नवी दिल्ली : सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Apple कडून आता आगामी iPhone 15 लाँच करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान आहे, ॲपल नवीन फोन लाँच करताना आपले जुने फोन एक-एक करुन बंद करत असते. त्यामुळे आता कंपनी iPhone 15 लाँच करण्यासोबतच तीन वर्षे जुना iPhone 12 हा बंद करणार आहे. याशिवाय त्याचे शिल्लक मॉडेल्स स्वस्तात विकले जाणार असून Apple च्या इतर iPhones वर जसेकी iPhone 13 आणि iPhone 14 स्मार्टफोनच्या किमतीत देखील आणखी कपात केली जाऊ शकते.
आता स्वस्तात खरेदी करा iPhone
तर आता जर तुम्ही iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, कारण Apple Store वर iPhone 12 बंद करण्यात आला आहे. परंतु ते Apple चे ऑफिशिअल पार्टनर स्टोअर आहेत तिथून तुम्ही फोन खरेदी करु शकता, याठिकाणी देखील iPhone 12 चा मर्यादित स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे. Apple ने iPhone 12 चे उत्पादन आधीच बंद केले होते. पण आता अधिकृतपणे बंद होत असून iPhone12 सध्या काही स्टोअर्स आणि निवडक डीलर स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

आता हे iPhone सर्वाधिक विकले जात आहेत
सध्या iPhone SE 2022, iPhone 12, iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone Pro आणि iPhone Pro Max हे Apple Store मधून अधिक विकले जात आहेत.
ही मॉडेल्स देखील लवकरच बंद केली जाऊ शकतात
याशिवाय, Apple कडून iPhone 15 लाँच करताना iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बंद केले जाऊ शकतात, कारण Apple गेल्या काही वर्षांपासून एक वर्ष जुने Pro आणि Pro Max मॉडेल बंद करत आहे. यासोबतच iPhone 13 Mini आणि iPhone 14 Plus देखील बंद केले जाऊ शकतात.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा