विशेष म्हणजे वनप्लसच्या या फोनवर दमदार अशी एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. या एक्सचेंज ऑफरमध्ये जवळपास २९,३५० रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. पण इतका अधिक एक्सचेंज बोनस मिळवण्याकरता जुन्या फोनचं मॉडेल आणि त्याची कंडीशन दोन्ही चांगलं असणं आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अॅमेझॉनचा revolution sale ३१ मे पर्यंतच सुरु राहणार आहे.
Oneplus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये ६.७ इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले दिला आहे. याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन असून 120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा ऑप्शनही आहे. प्रोसेसरचं म्हणाल तर 8th Gen Snapdragon हा प्रोसेसर असून अॅन्ड्रॉईड १२ बेस्ज लेटेस्ट Oxygen OS फोनमध्ये आहे. कॅमेऱ्याचं म्हणाल तर ४८ मेगापिक्सल मेन कॅमेरा असून ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि एक ८ मेगापिक्सल टेलिफोटो सेन्सर आहे. तसंत ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. ज्यामुळे अगदी काही मिनिटांत फोन चार्ज होऊ शकतो.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा