या निकालानंतर इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असून, केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सीईटीचा निकाल लागण्यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘कॅप’ प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू केली जाणार असल्याचे सीईटी सेलमार्फत सांगण्यात आले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यभरात सीईटी परीक्षांचे आयोजन केले होते. पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. २५ मार्चला एमबीए अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेपासून यावर्षीच्या सीईटी परीक्षांना सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थी संख्येच्या आधारावर एक किंवा एकापेक्षा जास्त दिवसांकरिता अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षा पार पडल्या आहेत.
सद्यस्थितीत बहुतांश अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा झालेल्या असून, आता पुढील टप्प्यात निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.
हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील पदवी (बी. एचएमसीटी), आणि पदव्युत्तर पदवी (एम. एचएमसीटी) सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यासोबत बीए / बीएस्सी. बी. एड. (इंटिग्रेटेड), बी. प्लॅनिंग, एम.आर्क., फाइन आर्ट (एएसी-सीईटी), एम. पीएड., एमसीए, विधी शाखेतील ५ वर्षे व ३ वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांची एलएलबी सीईटी, बी. डिझाइन सीईटी या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.